शेतात काम करताना मुलाचा विजेच्या तारेला स्पर्श, वाचवायला धावलेल्या आईचाही शॉक लागून मृत्यू

रानडुकरांपासून शेतीचे संरक्षण व्हावे, यासाठी लावलेल्या विजेच्या तारांना स्पर्श झाल्याने मायलेकाचा मृत्यू
शेतात काम करताना मुलाचा विजेच्या तारेला स्पर्श, वाचवायला धावलेल्या आईचाही शॉक लागून मृत्यू

पालघर : रानडुकरांपासून शेतीचे संरक्षण व्हावे, यासाठी लावलेल्या विजेच्या तारांना स्पर्श झाल्याने मायलेकाचा मृत्यू झाल्याची घटना बोईसरजवळील शिगाव-खुताड गावात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली. ओमप्रकाश सहानी (३५) व ललिता सहानी (५५) अशी मृतांची नावे आहेत.

बोईसरजवळील शिगाव-खुताड येथे असलेल्या मिरचीच्या वाडीमध्ये एक परप्रांतीय कुटुंब काम करत होते. त्या वाडीत शेतीचे रानडुकरांपासून संरक्षण व्हावे यासाठी विजेची तार कुंपणाला लावली होती. संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास शेतात काम करत असताना या विजेच्या तारेला स्पर्श होऊन मुलगा ओमप्रकाश कन्हैया सहानी (३५) आणि त्याला वाचवायला गेलेली त्याची आई ललितादेवी सहानी (५५) यांचा जागीच मृत्यू झाला. हे मूळचे बिहार राज्यातील होते. शेती व वाडीचे रानडुकरांपासून संरक्षण व्हावे यासाठी कुंपणाला लावलेल्या बेकायदा विद्युत प्रवाहाने याआधीही पालघर येथील नंडोरे येथे अशाच एका घटनेत दोघांचा बळी गेला होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in