अंबरनाथच्या पालेगाव येथे महावितरणचे सबस्टेशन उभारले जाणार

अंबरनाथच्या पालेगाव येथे महावितरणचे सबस्टेशन उभारले जाणार

अंबरनाथच्या पालेगाव येथे महावितरणचे सबस्टेशन उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. येथे सबस्टेशन उभारण्यासाठी आवश्यक असलेली जागा मिळण्याबाबतचा प्रस्ताव महावितरणकडून एमआयडीसीकडे सादर करण्यात आला असून त्याअनुषंगाने एमआयडीसी प्रशासनाकडून कार्यवाही सुरू असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

ऐन उन्हाळ्यात विद्युत वाहिनीत ओवर लोड व तांत्रिक बिघाड झाल्याने नागरिकांना वारंवार विद्युत पुरवठा खंडित होण्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत होते. याची दखल घेत आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या उपस्थितीत महावितरणचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांच्यासोबत आढावा बैठकीचे आयोजन केले होते.

या बैठकीत मुख्य अभियंत्यांनी ही माहिती दिली. केवळ दर शुक्रवारी तांत्रिक कामे करण्याकरिता मर्यादित वेळेत शटडाऊन घेऊन कामे पूर्ण करण्यात यावीत. बऱ्याचदा वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर तो पूर्ववत करण्यासाठी मर्यादेपेक्षा जास्त कालावधी लागत असल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असते. त्यामुळे तातडीने बिघाड शोधून जलदगतीने विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यावा आदी सूचना यावेळी आमदार डॉ. किणीकर यांनी दिल्या. महावितरणच्या आयपीडीएस योजनेअंतर्गत योग्य रितीने कामे करण्यात आली नसल्याने त्याकामांची ही चौकशी करण्यात येऊन उर्वरित कामे ही आरडीएसएस योजनेअंतर्गत करण्यात यावी.ही कामे योग्य दर्जा राखून विहित वेळेत पूर्ण करून घेणे गरजेचे असल्याचे यावेळी उपस्थितांच्या निदर्शनास आणून दिले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in