

ठाणे : एसटी महामंडळाच्या प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. 'आवडेल तेथे कोठेही प्रवास पास' योजनेंतर्गत चार आणि सात दिवसांचे पास आता ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे पास काढण्यासाठी आगार किंवा बसस्थानकातील तिकीट खिडकीवर रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही. प्रवाशांना घरबसल्या ऑनलाइन पास काढता येणार आहे.
यापूर्वी हे पास आगारांमधून हस्तलिखित पद्धतीने वितरित केले जात होते. त्यामुळे प्रवाशांना पास काढण्यासाठी तिकीट खिडकीवर वेळ खर्च करावा लागत होता. प्रवाशांचा वेळ वाचावा, तसेच पास वितरणाची प्रक्रिया अधिक सुलभआणि पारदर्शक व्हावी, यासाठी एसटी महामंडळाने ही डिजिटल सुविधा सुरू केली आहे.
क्यूआर कोड स्कॅन होत साधता येणार आहे. नसल्यास किंवा प्रवासादरम्यान तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास प्रवाशांना ०८०६५९०३२७२ आणि ०८०६५९०३२७३ या हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क या ऑनलाइन सुविधेचा प्रवाशांनी जास्तीत जास्त लाभघ्यावा, असे आवाहन एसटीच्या ठाणे विभागाच्या विभाग नियंत्रकांनी केले आहे.
मोबाईलमधील पीडीएफही ग्राह्य
प्रवाशांना महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आवश्यक माहिती भरून ऑनलाइन पास काढता येणार आहे. या प्रणालीद्वारे चार आणि सात दिवसांचे' आवडेल तेथे कोठेही प्रवास पास' उपलब्ध आहेत. ऑनलाइन काढलेला पास प्रिंट करून किंवा मोबाईलमधील पीडीएफ स्वरूपात दाखवून प्रवास करता येणार आहे.
क्यूआर कोडद्वारे होणार तपासणी
ऑनलाइन पासवर क्यूआर कोड देण्यात येणार असून, प्रवासादरम्यान वाहकाच्या ईटीआय मशीनद्वारे हा क्यूआर कोड स्कॅन करून पासची पडताळणी केली जाणार आहे. ऑनलाइन पासधारकांनी प्रवासादरम्यान वैध ओळखपत्र सोबत ठेवणे बंधनकारक आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा डिजिलॉकरमधील डिजिटल ओळखपत्र यापैकी कोणतेही ओळखपत्र प्रवाशाला सादर करता येणार आहे.