एमआयडीसी निवासी भागात नळाला गढूळ पाणी

गढूळ पाणी येत असल्याचे पाहून नागरिकांनी हे पाणी बाटलीत घेऊन ते एमआयडीसी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना दाखविले
एमआयडीसी निवासी भागात नळाला गढूळ पाणी

डोंबिवली : एमआयडीसी निवासी भागातील मॉडेल कॉलेज परिसरातील काही इमारतींचा नळाला आणि स्वर्गीय आनंद दिघे उद्यानातील नळाला गढूळ पाणी येत असल्याने नागरिक संतापले आहेत. नागरिकांनी एमआयडीसी कार्यालयात याबाबत फोन करून तक्रारी केल्यानंतर पाणी पुरवठा विभागाने दुरुस्ती करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आले.

गढूळ पाणी येत असल्याचे पाहून नागरिकांनी हे पाणी बाटलीत घेऊन ते एमआयडीसी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना दाखविले. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते, असे नागरिकांनी अधिकाऱ्यांना सांगितल्यावर याचे गांभीर्य ओळखून तात्काळ सदर ठिकाणची दुरुस्ती केली. एमआयडीसी भागात रस्त्यांचे काँक्रीटीकरण काम चालू असताना अनेक ठिकाणी पाण्याच्या पाइपलाईन फुटण्याचा घटना घडत आहेत. काही वेळा जमिनीच्या अंतर्गत भागात पाइपलाईन फुटली असता ती समजून येत नाही. त्यामुळे त्याची दुरुस्ती होत नाही. त्यातून कदाचित माती आणि गटाराचे पाणी पाइपलाईनमध्ये जाऊन पाणी गढूळ होण्याची शक्यता असते, असे येथील रहिवाशांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in