एकाच छताखाली मिळणार घर घेण्याच्या अनेक संधी, क्रेडाई एमसीएचआयचे १६ ते १९ फेब्रुवारी रोजी ठाणे गृह उत्सव

'आपलं स्वप्नातील घर व्हावे' अशी प्रत्येक नागरिकांची इच्छा असते, अनेकदा या स्वप्नातील घर शोधण्यासाठी पायपीट देखील करावी लागते.
एकाच छताखाली मिळणार घर घेण्याच्या अनेक संधी, क्रेडाई एमसीएचआयचे १६ ते १९ फेब्रुवारी रोजी ठाणे गृह उत्सव

प्रतिनिधी/ठाणे

'आपलं स्वप्नातील घर व्हावे' अशी प्रत्येक नागरिकांची इच्छा असते, अनेकदा या स्वप्नातील घर शोधण्यासाठी पायपीट देखील करावी लागते. ठाण्यातील अनेक विकासकांच्या माध्यमातून बांधण्यात आलेले प्रकल्प ठाण्यातील रेमंड मैदानात १६ फेब्रु. ते १९ फेब्रु. या कालावधीत क्रेडाई एमसीएचआयच्या 'ठाणे गृह उत्सव' या प्रदर्शनात ठाणेकरांना पाहता येणार आहेत. अशी माहिती एमसीएचआय ठाणेचे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या प्रदर्शनाचे उदघाटन १६ फेब्रु. रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. प्रदर्शनात यंदा प्रथमच गृह, पुर्नविकास, महारेरा यावर व्याख्यान तसेच परिसंवाद होणार असून, हेलिकाप्टरची आभासी सैर ठाणेकरांना घडवली जाणार आहे.

वर्तकनगर येथील रेमंड कंपनीच्या मैदानात होणाऱ्या क्रेडाई एमसीएचआयच्या "ठाणे गृह उत्सव' या प्रदर्शनात नामांकित विकासकांचे प्रकल्प असणार आहेत. त्यामुळे एकाच छताखाली अनेक प्रकल्प अधिकाऱ्यांना पाहता येणार आहेत. या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असून, या प्रदर्शनाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील निमंत्रण दिले असल्याचे एमसीएचआयचे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in