ग्रामीण भागात उच्च दर्जाच्या सेवा देण्यासाठी मल्टीस्पेशालिटी रुग्णालय महत्त्वाचे - तात्याराव लहाने

शहापुरातील चॅरिटेबल ट्रस्टच्या क्रिस्टलकेअर या मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते
ग्रामीण भागात उच्च दर्जाच्या सेवा देण्यासाठी मल्टीस्पेशालिटी रुग्णालय महत्त्वाचे - तात्याराव लहाने

पूर्वी रुग्णांना दुर्धर आजारांच्या उपचारासाठी कल्याण- ठाणे- मुंबई अशा मोठ्या शहरांमध्ये जावे लागत होते; परंतु शहापूर तालुक्यात या सर्व सुविधांचा अभाव असल्याने अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागत असल्याने उच्च दर्जाच्या सेवा देण्यासाठी डॉ. अमोल गिते शहराकडून ग्रामीण भागात उपलब्ध करण्याचे महत्वपूर्ण कार्य करत असल्याने मला याचा अभिमान वाटत असल्याचे मत पद्मश्री तात्याराव लहाने यांनी मांडले. ते शहापुरातील चॅरिटेबल ट्रस्टच्या क्रिस्टलकेअर या मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

सर्वसामान्य रुग्णांना परवडणाऱ्या दरात आसनगाव येथे विविध रुग्ण कल्याणकारी योजना राबवून रुग्णांना अगदी अल्प दरात उपचार मिळाले पाहिजे म्हणून नुकतेच पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते उदघाटन झाले.

कॅन्सर उपचार व शस्त्रक्रिया, सिटीस्कॅन, सुसज्ज अतिदक्षता विभाग, लहान मुलांचा व शिशु अतिदक्षता विभाग, चोवीस तास अपघात विभाग, डायलिसिस, रक्त साठवणूक केंद्र, लामीनार एअर फ्लो, सुसज्ज मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आदी अतिमहत्त्वाच्या आजारासाठी असणाऱ्या सुविधांसह मुंबई, ठाण्यात जावे लागत असे. त्यातही बऱ्याच ठिकाणी रुग्णांसाठी असलेल्या शासकीय योजना न राबविल्याने आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत असल्याने हे रुग्णालयात या ठिकाणी उभारले असल्याचे संचालक डॉ.अमोल गीते यांनी सांगितले. याप्रसंगी मुख्यमंत्री यांचे ओएसडी मंगेश चिवटे, आमदार दौलत दरोडा,माजी आमदार पांडुरंग बरोरा आदींसह मोठ्या संख्येने स्थनिक उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in