Mumbai Local Train Tragedy : कडी पकडून ठेवली म्हणून...; वाशिंदच्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती

दिवा स्थानकातील प्रवासी लोकलमध्ये चढल्यानंतर मला ठाण्याला उतरायचे असल्याने मी दरवाज्याजवळ आलो. तेव्हाच दिवा आणि मुंब्य्राच्या मध्ये वळणावर लोकल आली असता त्याच वेळेस समोरूनदेखील वेगाने लोकल येत होती.
वाशिंद येथील मच्छिंद्र गोतारणे
वाशिंद येथील मच्छिंद्र गोतारणे
Published on

दिवा स्थानकातील प्रवासी लोकलमध्ये चढल्यानंतर मला ठाण्याला उतरायचे असल्याने मी दरवाज्याजवळ आलो. तेव्हाच दिवा आणि मुंब्य्राच्या मध्ये वळणावर लोकल आली असता त्याच वेळेस समोरूनदेखील वेगाने लोकल येत होती. वळणावर दोन्ही ट्रेनचे डबे एकमेकांना धडकले गेले आणि त्या अपघातात माझ्या पायाला दुखापत झाली. मी लोकलच्या डब्याची कडी घट्ट पकडून ठेवली. मी खाली फेकलो गेलो नाही, अशी आपबिती वाशिंद येथील मच्छिंद्र गोतारणे (३८) यांनी सांगितली.

वाशिंदपासून १० ते १२ किमी अंतरावर मच्छिंद्र यांचे गाव आहे, रोज ते वाशिंद येथून लोकल पकडून ठाण्याला उतरून नवी मुंबई, तुर्भे येथे जात असतात. मागील आठ ते दहा वर्षांपासून ते अशा पद्धतीने लोकलचा प्रवास करीत आहेत. परंतु आधी कधीही अशी घटना घडली नसल्याचे त्यांनी सांगितले. सोमवारी कामाला निघाल्यानंतर दिवा स्थानकात प्रवासी चढल्यानंतर त्यांना आतमध्ये जाण्यास सांगून मी ठाण्याला उतरायचे असल्याने दरवाज्या समोर आलो. मात्र त्याच वेळेस दिवा आणि मुंब्य्राच्या मध्ये असलेल्या वळणावर लोकल आली आणि हा अपघात घडला.

असे व्हायला हवे होते का ?

मी ठाण्याला उतरायचे असल्याने दिवा गेल्यानंतर लोकलच्या दरवाजापुढे आली होती. मात्र आजच माझ्याबरोबर असे व्हायला हवे होते का, असा सवाल शहाड येथे वास्तव्यास असलेल्या आणि रेल्वे अपघातत जखमी झालेल्या प्रियंका भाटीया (२३) हिने विचारला आहे. प्रियंकाने सांगितले की, शहाड येथून मी लोकल पकडली. लोकला नेहमीच गर्दी असते. त्यामुळे दिवा गेल्यानंतर ठाण्याला उतरण्यासाठी मी दरवाज्याजवळ आली होती. परंतु दिवा, मुंब्रा येथील वळणावर लोकल असता समोरुनदेखील त्याच वेळेस वेगाने लोकल आली आणि धडक झाली. या धडकेत सुदैवाने मी रेल्वे खाली पडली नाही.

नशीब बलवत्तर म्हणून वाचलो..

रोज टिटवाळा ते ठाणे असा लोकल प्रवास करीत असतो. येणा-या आणि जाणा-या ट्रेन या वेगात असल्याने त्या वळणावर आल्या असताना दोन्ही ट्रेनचे डबे एकमेकांना धडकल्याने हा अपघात झाल्याची शक्यता आहे. मी डब्यातच पडल्याने सुदैवाने मला लागले नाही. नशीब बलवत्तर म्हणूनच मी अपघातातून वाचलो, असे मत तुषार भगत (२३) याने व्यक्त केले.

...आणि डब्यातच खाली पडलो

मी दिव्याला ट्रेनमध्ये चढलो. मी ज्या लोकलमध्ये होतो ती लोकल वळणार आली असता समोरुनदेखील लोकल आणि त्या लोकलच्या दरवाजाची धडक आम्ही प्रवास करीत असलेल्या लोकलला बसली. माझ्या हाताला धडक बसली. माझा हात फ्रॅक्चर झाला आणि डब्यातच खाली पडलो, अशी प्रतिक्रिया मनीष सरोज (२७) या प्रवाशाने व्यक्त केली.

logo
marathi.freepressjournal.in