
मुंबई-नाशिक महामार्गावर भिवंडी तालुक्यातील खडवली गावाच्या क्रॉसिंगवर कंटेनर आणि प्रवासी वाहतूक जीपचा भीषण अपघात झाला. या अपघात प्रवासी जीपमधील चार प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर पाच प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. भरधाव येणाऱ्या कंटेनरने काळी पिवळी प्रवासी जीपला जोरदार धडक दिल्याने प्रवासी जीप साठ फूट दूर फेकली गेली. या अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
मुंबई-नाशिक महामरार्गावर भिंवंडीतील खडवली फाट्याजवळ हा अपघात झाला. प्रवासी जीप खडवली स्टेशनच्या दिशेने जात होती. या जीपमध्ये काही विद्यार्थी देखील होते. जीप क्राँसिगजवळ वळत घेताना मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या कंटेनकरने जीपला जोरदार धडक दिली. यात प्रवासी जीप जवळपास ६० फूट दूर फेकली गेली. या अपघातात जीपमध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे.
या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस स्टेशनचं पथकाने घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करुन चारही मृतदेहांना शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात रवाना केले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरु केला आहे.