भिवंडी ठरतेय बांगलादेशी नागरिकांचे आश्रयस्थान; सहा वर्षांत १०० हून अधिकांचे वास्तव्य

अधिकृत व्हिसा नसताना छुप्या मार्गाने बांगलादेशातून भारतात येऊन भिवंडीत वास्तव्य करणाऱ्या चार बांगलादेशी नागरिकांना भिवंडी पोलीस उपायुक्त परिमंडळच्या अखत्यारितील ३ पोलीस ठाण्यातील पोलीस पथकाने ताब्यात घेऊन त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
भिवंडी ठरतेय बांगलादेशी नागरिकांचे आश्रयस्थान; सहा वर्षांत १०० हून अधिकांचे वास्तव्य
Published on

सुमित घरत/भिवंडी

पहलगाममधील दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर देशभरात सुरक्षा यंत्रणांसह स्थानिक पोलीस प्रशासनाकडून अवैधपणे भारतात वास्तव्य करणाऱ्या पाकिस्तानी आणि बांगलादेशी नागरिकांची धरपकड सुरूच असतानाच भारताचे अधिकृत नागरिक नसताना तसेच भारतात येण्यासाठी पारपत्र, अधिकृत व्हिसा नसताना छुप्या मार्गाने बांगलादेशातून भारतात येऊन भिवंडीत वास्तव्य करणाऱ्या चार बांगलादेशी नागरिकांना भिवंडी पोलीस उपायुक्त परिमंडळच्या अखत्यारितील ३ पोलीस ठाण्यातील पोलीस पथकाने ताब्यात घेऊन त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

यामध्ये ३ पुरुषांसह एका महिलेचा समावेश आहे. पाकिस्तानी नागरिक असल्याचे माहीत असतानाही ७ आरोपींनी त्यांना बनावट ओळखपत्र व इतर कागदपत्र बनवून देऊन अवैधरीत्या हारून व अस्लमला भारतात प्रवेश करून देऊन भारताचे सुरक्षिततेस धोका निर्माण केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले होते. सोमवारच्या कारवाईत आसिफ आतिक शेख (२४), मोहम्मद आलीम अमजद खान (४०), यासमीन मोहमंद सोफी शेख (३३), शरीफुल गुलाम शेख (४१) अशी अटक केलेल्या बांगलादेशी नागरिकांची नावे आहे. पहिल्या घटनेत आसिफ आणि मोहम्मद या दोघांनी भारतात छुप्या मार्गाने भारतात प्रवेश करून कल्याण व त्यानंतर शांतीनगर येथे वास्तव्य करीत आढळून आल्याने शांतीनगर पोलिसांनी दोघांनाही अटक केली असून त्यांच्याकडून ५ हजार रुपये किमतीचा मोबाइल जप्त केला आहे. दुसऱ्या घटनेत यासमीन शेख ही बांगलादेशातून भारतात येऊन भिवंडी तालुक्यात भाडेतत्त्वावर राहत असल्याचे समोर आल्याने यास्मीन विरोधात कोनगाव पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करून तिला अटक केली असून तिच्याकडून १० हजार रुपये किमतीचा मोबाइल जप्त करण्यात आला आहे. तर तिसऱ्या घटनेत शरीफुल हा बांगलादेशातून भारतात येऊन दापोडा गावच्या हद्दीतील ए.आर.सी. हॉटेलमध्ये वास्तव्यास असून त्याच्यावर नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.

विशेष म्हणजे गेल्या सहा वर्षात १०० हून अधिक बांगलादेशी नागरिकांना भिवंडी शहर आणि ग्रामीण भागातून अटक करण्यात आल्याने भिवंडी शहर बांगलादेशी नागरिकाचे आश्रय स्थान झाल्याचे दिसून येत आहे. खळबळजनक बाब म्हणजे गेल्या दोन वर्षांपूर्वी नवरात्री व दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सर्तक होऊन ठाणे जिल्ह्यात ठिकठिकाणी छापेमारी करीत होते.

पाकिस्तानी-बांगलादेशी नागरिकांचे वास्तव्य

पीएफआय संघटनेच्या ३ पदाधिकाऱ्यांना भिवंडी शहरातून गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले होते, तर भिवंडी तालुक्यातील पडघा गावाच्या हद्दीतून इसिसच्या सहा दहशतवाद्यांना काही महिन्यांपूर्वीच अटक करण्यात आली होती. एकंदरीतच भिवंडी शहर व ग्रामीण भागात दहशतवादीसह पाकिस्तानी आणि बांगलादेशी नागरिकांच्या वास्तव उघड झाल्याने ठाणे जिल्ह्यास मुंबईच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोक्याचे असल्याची चर्चा नागरिक करताना दिसत आहे.

logo
marathi.freepressjournal.in