अनधिकृत होर्डिंग्जवर महापालिकेची कारवाई

भाईंदर पूर्व व पश्चिमेला जाणाऱ्या उड्डाणपुलावर सहा महिन्यांपूर्वी अनधिकृत जाहिरात होर्डिंग्ज उभारण्यात आली होती.
अनधिकृत होर्डिंग्जवर महापालिकेची कारवाई

भाईंंदर : भाईंदर पूर्व- पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलावर अनधिकृत जाहिरात होर्डिंग्ज उभारण्यात आले होते. या अनधिकृत जाहिरात होर्डिंग्जवर कारवाई करण्यासाठी अनेकांनी मागणी केली होती. परंतु महापालिकेकडून कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात होती. अखेर ६ महिन्यानंतर उभारण्यात आलेले अनधिकृत होर्डिंग्ज महापालिकेने काढले आहेत.

मात्र, अनधिकृत होर्डिंग्ज उभारल्याप्रकरणी ठेकेदारांवर कोणतीच कारवाई केलेली नाही त्यामुळे नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. ठेकेदारावर एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. मीरा-भाईंदर शहरात अनेक ठिकाणी अनधिकृत जाहिरात होर्डिंग्ज उभारल्या आहेत.

भाईंदर पूर्व व पश्चिमेला जाणाऱ्या उड्डाणपुलावर सहा महिन्यांपूर्वी अनधिकृत जाहिरात होर्डिंग्ज उभारण्यात आली होती. ठेकेदाराने महापालिकेची कोणतीही परवानगी नसताना हे होर्डिंग्ज उभारले होते. या होर्डिंग्जवर कारवाई करण्यासाठी अनेक वेळा तक्रारी करूनही महापालिकेकडून कोणतीही कारवाई केली जात नव्हती. या होर्डिंग्जवर कारवाई होत नसल्याने एका राजकीय पक्षाकडून आंदोलन करण्यात आले होते. तरीही कारवाई करण्यास महापालिका अधिकारी टाळाटाळ करत होते. ठेकेदाराला पाठीशी घालणाऱ्याविरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात येत होती. वारंवार येणाऱ्या तक्रारीमुळे महापालिकेने नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी या अनधिकृत जाहिरात होर्डिंग्जवर कारवाई करत ते काढून टाकण्यात आले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in