किसन कथोरे यांना मंत्रिपद न दिल्याने मुरबाडवासी नाराज; आगामी निवडणुकांसाठी मोर्चे बांधणी सुरू

आमदार किसन कथोरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यने भाजपची ताकद वाढणार असल्याचे चित्र दिसत आहे
किसन कथोरे यांना मंत्रिपद न दिल्याने मुरबाडवासी नाराज; आगामी निवडणुकांसाठी मोर्चे बांधणी सुरू

येत्या महानगरपालिका, जिल्हापरिषद, ग्रामपंचायतीच्या निवडणुका प्रचाराची रंगत गोकुळाष्टमीपासून सुरू झाली असून गणेशोत्सव,नवरात्रौ या सणांमध्ये ती अधिक जोरदार करण्यासाठी मुरबाडचे आमदार तथा ठाणे जिल्हा ग्रामीण भाजपचे अध्यक्ष किसन कथोरे यांची मोर्चे बांधणी सुरू केली आहे.

गेली अनेक वर्षे ठाणे जिल्हा मुरबाड विधानसभेवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. त्यामध्ये कुणबी समाजासह बहुजनांचे स्टार नेतृत्व म्हणून किसन कथोरे यांच्यावर सर्वश्री जबाबदारी सोपविली जात असे यामुळेच विरोधीपक्ष म्हणून शिवसेना ८० टक्के २० टक्के भाजप अशी स्थिती होती. मात्र आमदार किसन कथोरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यने भाजपची ताकद वाढणार असल्याचे चित्र दिसत आहे. मुरबाड जिल्हापरिषदेच्या उमेदवारीने ठाणे जिल्हापरिषदेवर सत्ता येते तसेच बदलापुर, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली, ठाणे आणि भिवंडी महानगरपालिका श्रेत्रात तसेच कल्याण, शहापुर, भिवंडी, मुरबाड, अंबरनाथ पंचायत समितीसह ग्रामपंचायत, सेवासोसायटया कृषी उत्पन्न बाजार समित्या, नगरपंचायत मुरबाड शहापुर सर्वत्र आमदार किसन कथोरे यांचे समाजिक सबंध मुरबाडवासी कुणबीसमाजासह बहुजन समाजामध्ये मोठा दबदबा आहे त्याचा फायदा किसन कथोरे यांना होउ शकतो.

नुकत्याच जाहीर झालेल्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षणाचावाद, शिवसेनेत दोन गटाची फाळणी, महाविकास अघाडीतून बाहेर पडलेली बंडखोरी आणि शिवसेना शिंदे गट भाजपच्या सहाय्याने बनलेल्या सरकारचा नुकताच मंत्रीविस्तार झाला त्यामध्ये पहिल्या यादीत गेलेचार वेळा निवडून आलेले आमदार किसन कथोरे यांना मंत्रिपद दिले गेले नसल्यामुळे त्यांच्या नाराजीचे पडसाद संपुर्ण कोकण महाराष्ट्रासह ठाणे पालघर जिल्हयावर उमटले आहेत, त्याचा फटका भविष्यात भाजपसह एकनाथ शिंदे गटाला बसण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांना निवडून आणण्यासाठी भाजपचे किसन कथोरे यांच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जबाबदारी सोपावली होती. स्थानिक भुमीपुत्र श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात असताना शिवसेनेचा खासदार झाला त्याकडे सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्लक्ष करून चालणार नाही.

भिवंडी लोकसभा मतदार संघात मुरबाड विधानसभेतील तीन लाखाच्यावर मतदार संख्या असुन कल्याण, शहापुर, भिवंडी विधानसभेच्या मतदार संघात मुरबाड एवढेच प्राबल्य आमदार किसन कथोरे यांचे आहे. पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांना निवडून आणण्याची जबाबदारी आमदार किसन कथोरे यांनी घेतली आणि कपिल पाटील यांना प्रचंड मतांनी निवडून आणले आहे त्याचा विसर भाजपला पडल्यास भाजप भविष्यात प्रत्येक निवडणुकीत पिछाडीवर पडेल अशी जाणकरांचे म्हणणे आहे.

किसन कथोरेंच्या मंत्रिपदाला विरोध म्हणजे राजकीय पराभव ?

आमदार किसन कथोरे यांना मंत्रिपद मिळावे अशी ठाणे पालघर कोकणासह महाराष्ट्रातील कुणबीसमाजासह बहुजन समाजाची मांगणी आहे.राजकीय सामाजिक सर्व स्तरातील कार्यकर्ते यांनी आमदार किसन कथोरे यांच्या मंत्रिपदासाठी अपेक्षा व्यक्त केली आहे. परंतू भाजपची कोअरकमेटी शिंदे सरकार काय भुमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. आमदार किसन कथोरे यांच्या मंत्रिपदाला विरोध म्हणजे राजकीय पराभव असे समीकरण मुरबाड मतदार संघात बनले आहे. आमदार किसन कथोरे यांना मंत्रिपद मिळाल्यास ग्रामीण भागाचा सर्वांगिण विकास होईल तसेच प्रलंबित प्रकल्प मार्गी लागतील आणि याचा फायदा भाजपला होईल असे जाणकारांचे म्हणणे आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in