मुरबाड विधानसभा मतदार संघाची मोर्चेबांधणी सुरु; शिंदे गटाला संधी मिळणार?

भिवंडी पश्चिम विधानसभा, भिवंडी पुर्व विधानसभा, मुरबाड विधानसभा, शहापूर विधानसभा असे मतदार संघ आहेत.
मुरबाड विधानसभा मतदार संघाची मोर्चेबांधणी सुरु; शिंदे गटाला संधी मिळणार?

२०२४ च्या लोकसभेची मोर्चेबांधणी मुरबाडमध्ये गेल्या सहा महिन्यापासून सुरू आहे. यामध्ये भिवंडी लोकसभा जिंकण्यासाठी एकमेव मुरबाड विधानसभा मतदार संघ हा महत्वाचा असल्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी, उध्दव गट, शिंदे गट आणि भाजप या चारही राजकीय पक्षाच्या इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यामुळे मुरबाडमध्ये राजकीय वातावरण तापलेले आहे.

भिवंडी लोकसभा मतदार संघ, कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ, भिवंडी ग्रामीण विधानसभा, भिवंडी पश्चिम विधानसभा, भिवंडी पुर्व विधानसभा, मुरबाड विधानसभा, शहापूर विधानसभा असे मतदार संघ आहेत. महाराष्ट्रातील मुरबाड जिल्ह्यात सहा विधानसभा मतदार संघ आहेत. सन २०१९ मध्ये भाजपसेना युतीचे कपिल पाटील यांच्याविरोधात काँग्रेस राष्ट्रवादीचे सुरेश टावरे यांची लढत झाली होती. परंतु शिंदे समर्थक बाळ्यामामा म्हात्रे यांनी कपिल पाटील यांच्याविरोधात छुपी मदत काँग्रेस राष्ट्रवादीला केली होती. मात्र काँग्रेसचे सुरेश टावरे अखेरच्या क्षणी भिवंडी लोकसभेच्या मुरबाड विधानसभेत कमी पडल्याने कपिल पाटील यांचा विजय झाला.

भिवंडी लोकसभा मतदार संघ तसा परशुराम टावरे यांचा काँग्रेसी मतदार संघ आहे. मोठया प्रमाणात मुस्लीम समाज असलेली मते काँग्रेसच्या पारडयातच पडतात. शिवाय मुरबाड, कल्याण, पडघा, बदलापुर येथील शहरी आणि ग्रामीण भागातील मुस्लीम समाजाची मते काँग्रेस शिवाय अन्य पक्षांना मिळत नाही. मात्र तेच तेच चेहरे आणि सामान्याच्या विकासाकडे दुर्लक्ष यामुळे मतदारांनी भाजपला कौल दिल्याचे विसरता येणार नाही. दयानंद चोरघे, भाजपचे तत्कलीन अध्यक्ष आमदार किसन कथोरे, आताचे ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष कुणबी सेनेचे विश्‍वनाथ पाटील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट अन्य सामाजिक समाज संघटना एकेकाळी भाजपच्या कपिल पाटील यांच्याबरोबर होते. मात्र आज त्यांच्या विरोधात काम करत आहेत.

मुरबाडची मतदार संख्या २० लाखाच्यावर झाली आहे. सर्वात जास्त मतदान मुरबाड विधानसभा मतदार संघात झाले होते. मुरबाड विधानसभा मतदार संघाचे आमदार किसन कथोरे आणि खासदार तथा केंद्रीयमंत्री कपिल पाटील यांच्यात उघड गटबाजी असल्याचे चित्र अनेकवेळा मुरबाडकरांनी पाहिले आहे. काँग्रेसचे ग्रामिण जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरघे, राष्ट्रवादीचे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष बाल्यामामा म्हात्रे आणि भाजपचे ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष किसन कथोरे यांची मतदार संघात समान पकड आहे.

शिवाय आताच्या राजकारणात खा. कपिल पाटील यांच्याविरोधात उध्दव ठाकरे गटाचे भिवंडीचे माजी आमदार रूपेश म्हात्रे हे सुध्दा उभे राहील्याने भाजपचे भिवंडी लोकसभा मिशन शिंदे गटाकडे जाण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. ठाणे जिल्ह्यातील भाजप आमदार मंदा म्हात्रे, गणेश नाईक, संजय केळकर, रविंद्र चव्हाण, किसन कथोरे, नरेंद्र पवार, जगन्नाथ पाटील यांचे पाठबळ लाभले होते. परंतु एकनाथ शिंदे यांच्या विनंती वरून मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी बदलापूर, अंबरनाथ, डोंबिवली, उल्हासनगर, कल्याणमधील मते खा. श्रीकांत शिंदे यांच्या बाजूने वळविल्यामुळे शिंदे निवडून आले होते. श्रमजींवी संघटना, कुणबी सेना अन्य छोट्या पक्षाच्या संघटनाची मदत घेवून केवळ ७० हजार मतांनी कपिल पाटील यांनी विजय मिळवला होता. हीच स्थिती एकेकाळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा तेव्हाचे लोकसभा उमेदवार बाळ्यामामा म्हात्रे यांची होती हे विसरून चालणार नाही. येथील मोठ्या प्रमाणात कुणबी समाज, स्थानिक नेतृत्त्व आमदार किसन कथोरे यांच्या नेतृत्तवावर विश्वास ठेवतो.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in