मुरूड-एकदरा परिसरात पहाटे धुक्याऐवजी विषारी धुराची चादर

पहाटे स्वच्छ हवेत ऑक्सिजन मिळवण्यासाठी अनेक नागरिक व ग्रामस्थ फिरायला येत असतात.
मुरूड-एकदरा परिसरात पहाटे धुक्याऐवजी विषारी धुराची चादर

मुरूड : मुरूड-एकदरा परिसरात पहाटेच्या वेळी धुक्याऐवजी प्लास्टिकच्या विषारी धुराची चादर पसरत आहे. या परिसराला विषारी वायूचा विळखा पडत आहे. मॉर्निंगवॉक घेणाऱ्यांना ऑक्सिजनऐवजी प्रदूषित विषारी वायूचा श्वास घ्यावा लागतो आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी व ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. या भंगारवाल्यांवर कारवाई होत नसल्याने रान मोकळे झाले आहे.

या परिसरात भंगारवाले भंगारमध्ये मिळणाऱ्या केबल जमा करून यातील तांब्याच्या (कॉपर) तारा काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात जाळ करून प्लास्टिकपासून निर्माण होणारा विषारी वायू सोडून मोठ्या प्रमाणात प्रदूषण करीत आहेत. या धुराचे प्रमाण इतके असते की, संपुर्ण परिसरात धुक्याऐवजी विषारी धुराची चादर पसरलेली पहावयास मिळते आहे.

पहाटे स्वच्छ हवेत ऑक्सिजन मिळवण्यासाठी अनेक नागरिक व ग्रामस्थ फिरायला येत असतात. या फिरणाऱ्यांना ऑक्सिजनऐवजी प्रदूषित विषारी प्लास्टिक धुराचा श्वास घ्यावा लागतो आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी व ग्रामस्थांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. या प्रदूषण करणाऱ्या भंगारवाल्यांवर प्रशासनाने कडक कारवाई करावी, अशी मागणी करीत आहेत. अशा अनेकदा हे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे, तरी प्रशासन गंभीर दखल घेत नसल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in