डोंबिवलीत 'माय मरो...मौसी जगो!' शाळेच्या बसवरील बॅनर चर्चेचा विषय

डोंबिवलीत विद्यानिकेतन शाळेच्या बसवर लावलेला 'माय मरो मौसी जगो!' बॅनरची शहरात चर्चा सुरु असल्याचे चित्र पाहावयास मिळेत आहे. मराठी भाषेवरील वाढत अन्याय, मुंबईतील मराठी लोकसंख्येचा घटता टक्का आणि शिक्षण संस्थांमधील हिंदी सक्ती यावर या बॅनरद्वारे थेट आणि परखड भाष्य करण्यात आले.
डोंबिवलीत 'माय मरो...मौसी जगो!' शाळेच्या बसवरील बॅनर चर्चेचा विषय
Published on

डोंबिवली : डोंबिवलीत विद्यानिकेतन शाळेच्या बसवर लावलेला 'माय मरो मौसी जगो!' बॅनरची शहरात चर्चा सुरु असल्याचे चित्र पाहावयास मिळेत आहे. मराठी भाषेवरील वाढत अन्याय, मुंबईतील मराठी लोकसंख्येचा घटता टक्का आणि शिक्षण संस्थांमधील हिंदी सक्ती यावर या बॅनरद्वारे थेट आणि परखड भाष्य करण्यात आले.

एकीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ५ जुलै रोजी मुंबईत भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे. त्याला सर्व स्तरातून पाठिंबा मिळत असताना बसवरील बॅनर हिंदीसक्ती करणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालण्याचे काम करत आहे. हिंदी सक्तीविरोधात मोर्चा काढण्याच्या पार्श्वभूमीवर या बॅनरची चर्चा रंगली आहे.

logo
marathi.freepressjournal.in