अग्निपथ योजनेविरोधात राष्ट्रवादी युवक आक्रमक

सुमारे अर्धा तास हायवेवर रास्ता रोको करण्यात आल्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली
अग्निपथ योजनेविरोधात राष्ट्रवादी युवक आक्रमक

चार वर्षांसाठी सैन्यात भरती करून नंतर तरूणांना वाऱ्यावर सोडणाऱ्या अग्निपथ या योजनेविरोधात राष्ट्रवादी युवक आक्रमक झाली आहे. ठाणे शहरात गृहनिर्माण मंत्री डाॅ. जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली युवक शहराध्यक्ष विक्रम खामकर यांच्या नेतृत्वाखाली तसेच प्रदेश सरचिटणीस उमेश अग्रवाल यांच्या उपस्थितीत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सुमारे अर्धा तास हायवेवर रास्ता रोको करण्यात आल्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.

केंद्र सरकारने नियमित सैन्य भरती बंद करून अग्निपथ ही योजना आणली आहे. या योजनेनुसार सैन्यात भरती होणाऱ्या तरूणांना चार वर्षांनंतर निवृत्त करण्यात येणार आहे. यामुळे बेरोजगारांची संख्या वाढीस लागणार आहे. तसेच या तरूणांना भाजपच्या कार्यालयावर सुरक्षा रक्षक म्हणून नेमण्यात येणार असल्याचे भाजपचे नेते म्हणत आहेत, या सर्वांचा निषेध म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या ठाण्यातील कार्यकर्त्यांनी पाचपाखाडी येथे मुंबईच्या दिशेने जाणारा पूर्वद्रूतगती महामार्ग अडवला. अचानक केलेल्या या आंदोलनामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. सुमारे अर्धा तासानंतर नौपाडा पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतली. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार झटापट झाली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in