Jitendra Awhad : फाशी झाली तरी चालेल, पण... ; जामीनानंतर काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना जामिनावर सुटका मिळाल्यानंतर विरोधकांवर केले गंभीर आरोप. पोलिसांच्या सुटकेनंतर काय म्हणाले?
Jitendra Awhad : फाशी झाली तरी चालेल, पण... ; जामीनानंतर काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी विवियाना मॉल मारहाण प्रकरणात ठाणे कोर्टातून जामिनावर सुटका करण्यात आली. सुटका झाल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. "फाशी झाली तरी चालेल, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे विद्रुपीकरण होऊ देणार नाही" या भूमिकेवर ते ठाम आहेत. तर, 'माझ्या अटकेवेळी पोलिसांची हतबलता दिसून आली. छत्रपती शिवाजी महाराजांची होणारी बदनामी रोखण्याचा आम्ही गुन्हा केला का? असा सवाल त्यांनी विचारला.

"छत्रपती शिवाजी महाराजांना नरसिंहाच्या अवतार दाखवल्याने त्यांच्या चातुर्याला धक्का लागला आहे. महिलांचा बाजार भरत होता, असा खोटा इतिहास हर हर महादेव चिटपटात दाखवला आहे. याचे काहीच ऐतिहासिक पुरावे नाही, असे सांगताना महाराजांनी माणसांच्या खरेदी विक्रीवर बंदी घालण्यात आली होती. तरीही तसे दाखविण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासला धक्का लागत आहे. बाजूप्रभू त्यांच्या विरोधात होते हे दाखवत बाजीप्रभू देशपांडेच्या इतिहासाला धक्का लावत आहेत." असे आरोप जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी केले आहेत.

पुढे जितेंद्र आव्हाड यांनी आरोप करताना म्हंटले की, "महाराष्ट्राला दाखविण्यासाठी घाईगडबडीने अटक करण्यात आली. आम्ही काहीही करू शकतो हे दाखविण्यासाठी आम्हाला अटक करण्यात आली. आम्हाला काल पोलिस ठाण्यात ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करण्यात आला. प्रेक्षकाला आम्ही मारहाण केली नाही, हे त्यानेच स्पष्ट केले. तरीही मला अटक करण्यात आली, यामागे कोण आहे. हे स्पष्ट करण्याची गरज नाही ते सर्वांना माहिती आहे. पोलिसांचा यात काहीच दोष नाही त्यांच्यावर दबाव होता,"

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in