राष्ट्रवादीच्या राकेश कासार यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

येणाऱ्या काही दिवसात अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार असल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे.
राष्ट्रवादीच्या राकेश कासार यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

तळा : तळा शहरातील खा. सुनील तटकरे यांचे खंदे समर्थक म्हणून परिचित असलेल्या राकेश कासार यांनी पेण येथे भाजप रायगड जिल्हाध्यक्ष आणि रायगड लोकसभेचे संभाव्य उमेदवार धैर्यशील पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी श्रीवर्धन विधानसभा प्रमुख प्रशांत शिंदे, रायगड जिल्हा महिला अध्यक्षा हेमा मानकर, तळा तालुका भाजप अध्यक्ष ॲड. नीलेश रातवडकर, सचिव खेळू वाजे, नगरसेवक रितेश मुंढे, नगरसेविका ॲड. दिव्या रातवडकर, उपाध्यक्ष महादेव आर्डे आदी मान्यवर उपस्थित होते.

राकेश कासार यांच्या भाजप प्रवेशामुळे तळा शहरात भाजपला बळ मिळाले असून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चिंता वाढली आहे. तळा नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेऊन प्रभाग क्रमांक ८ मधून दोन टर्म राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार नगरसेवकपदी निवडून आणला आहे. तसेच येणाऱ्या काही दिवसात अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार असल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in