पर्यटकांसाठी मोठा दिलासा! आजपासून नेरळ-माथेरान मिनी ट्रेन पुन्हा रुळावर; बघा वेळापत्रक

Neral-Matheran mini train starting : मध्य रेल्वेने नेरळ- माथेरान सेवा आजपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
पर्यटकांसाठी मोठा दिलासा! आजपासून नेरळ-माथेरान मिनी ट्रेन पुन्हा रुळावर; बघा वेळापत्रक
Published on

मुंबई : मध्य रेल्वेने नेरळ- माथेरान सेवा आजपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार बुधवार, ६ नोव्हेंबर पासून नेरळ-माथेरान सेवा सुरू होणार असल्याने पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे प्रशासनाने नेरळ-अमन लॉज दरम्यानची सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. पावसाळा संपताच मध्य रेल्वेने नेरळ- माथेरान-नेरळ मिनी ट्रेन सेवा आणि नेरळ-माथेरान डाऊन ट्रेन्स सुरू करण्याचे जाहीर केले आहे.

त्यानुसार दररोज सकाळी नेरळहून ८.५० वाजता ट्रेन सुटेल. ही गाडी माथेरानला ११.३० वाजता पोचेल. ही सेवा दररोज असेल. यानंतर सकाळी १०.२५ वाजता नेरळहून गाडी सुटेल. ही गाडी माथेरान १ वाजून ५ वाजता पोचेल. ही गाडी दररोज असेल.

माथेरान-नेरळ अप ट्रेन्स दररोज धावणार असून माथेरानहून दुपारी २.४५ वाजता प्रस्थान होईल. ही गाडी नेरळला ५.३० वाजता पोचेल. तर माथेरानहून सायंकाळी ४ वाजता सुटणारी गाडी नेरळ ला ६.४० वाजता पोचेल.

ही गाडी दररोज चालविण्यात येणार आहे. या गाड्या ६ डब्यांच्या असून ज्यामध्ये ३ द्वितीय श्रेणी, एक प्रथम श्रेणी आणि २ द्वितीय श्रेणीसह लगेज व्हॅनचा समावेश आहे.

ही गाडी दररोज चालविण्यात येणार आहे. या गाड्या ६ डब्यांच्या असून ज्यामध्ये ३ द्वितीय श्रेणी, एक प्रथम श्रेणी आणि २ द्वितीय श्रेणीसह लगेज व्हॅनचा समावेश आहे.

logo
marathi.freepressjournal.in