वर्तमानपत्र विक्रेते गांगुर्डे सामाजिक पुरस्काराने सन्मानित

गेली पन्नास वर्षे ते वर्तमानपत्र विक्रेते म्हणून नौपाडा, दादा पाटील वाडी, गोखले रोडे, भास्कर कॉलनी येथे घरोघरी वर्तमानपत्र पोहचवतात.
वर्तमानपत्र विक्रेते गांगुर्डे सामाजिक पुरस्काराने सन्मानित

ठाणे : ठाणे शहरातील ज्येष्ठ वर्तमानपत्र विक्रेते विठ्ठल गांगुर्डे यांना सामाजिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गेली पन्नास वर्षे ते वर्तमानपत्र विक्रेते म्हणून नौपाडा, दादा पाटील वाडी, गोखले रोडे, भास्कर कॉलनी येथे घरोघरी वर्तमानपत्र पोहचवतात.

प्रसंगी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे व महासचिव डॉ. विश्वासराव आरोटे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे येथे टाऊन हॉलमध्ये विशेष, भव्य आरोग्य शिबीर, दिनदर्शिका प्रकाशन, वैद्यकीय योजना कार्ड वाटप, विशेष गौरव पुरस्कार सोहळ्याचा आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला यानिमित्ताने विठ्ठल गांगुर्डे यांचा सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिराचे उद्घाटन निवृत्त माहिती संचालन महाराष्ट्र शासन देवेंद्र भुजबळ, संकपाळ उद्योग समूहाचे संचालक डॉ. संभाजी संकपाळ, माजी नगरसेवक संजय तरे, महेश्वरी तरे, समाजसेवक धनंजय सिंग सिसोदिया, प्रमुख सल्लागार ठाणे शहर प्रमोद इंगळे, कोकण विभागीय अध्यक्ष नितीन शिंदे व ठाणे शहर जिल्हाध्यक्ष राजन पाटील यांच्या उपस्थितीत झाले. टायटेन मेडिसिटी, संस्कार सेवा संस्था व ओम ॲक्युप्रेशर व हाडवैद्य यांच्या विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

logo
marathi.freepressjournal.in