पायाचं दुखणं पण गुप्तांगाची शस्त्रक्रिया; लहानग्याच्या आई-वडिलांचा गंभीर आरोप, सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

शहापूर तालुक्यातील सावरोली या ठिकाणी राहणाऱ्या आदिवासी मुलाच्या पायाला संसर्ग झाला होता. त्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यास १५ जून रोजी शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
पायाचं दुखणं पण गुप्तांगाची शस्त्रक्रिया; लहानग्याच्या आई-वडिलांचा गंभीर आरोप, सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

शहापूर : शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयाचा बेबंदशाही कारभार दिसून येत आहे. या रुग्णालयात एका मुलाच्या पायाच्या शस्त्रक्रियाबरोबरच त्याच्या गुप्तांगाची शस्त्रक्रिया त्याच्या पालकांच्या परवानगी शिवाय करण्यात असल्याचा प्रकार उघडकीस आला असल्याने या प्रकारामुळे रुग्णाच्या आई- वडिलांनी चिंता व्यक्त केली असून, या प्रकाराबाबत नेमण्यात आलेल्या जिल्हास्तरीय चौकशी समितीचा अहवाल गुलदस्त्यात असल्याचे समजते.

शहापूर तालुक्यातील सावरोली या ठिकाणी राहणाऱ्या आदिवासी मुलाच्या पायाला संसर्ग झाला होता. त्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यास १५ जून रोजी शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावर १७ तारखेला शस्त्रक्रिया करण्यात आली. पायाची शस्त्रक्रिया करण्याबरोबरच संबंधित डॉक्टरांनी त्या मुलाच्या गुप्तंगाची शस्त्रक्रिया केल्याचा आरोप मुलाच्या आईने केला आहे. याबाबत सूचना किंवा परवानगी घेण्यात आली नव्हती. नेमण्यात आलेल्या समितीचा अहवाल काय आहे हे समजू शकले नाही. याबाबत डॉ. अशिलाक शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता, संपर्क होऊ शकला नाही.

शहापूर तालुका हा ठाणे जिल्ह्यात सर्वात मोठा तालुका आहे. या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय व्हावे यासाठी मागणी होत असताना झालेल्या उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांची वानवा, साधनांचा तुटवडा आदी समस्यांनी हे उपजिल्हा रुग्णालय ग्रासले आहे.

logo
marathi.freepressjournal.in