जागतिक आदिवासी दिनी नितीन बल्लाळ यांचा प्रकल्प अधिकारी यांच्याकडून सत्कार

प्रकल्प अधिकारी आयुशी सिंह यांच्या वतीने हरिश्चद्र भोये भाजपा आदिवासी आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांच्याकडून सत्कार करण्यात आला.
जागतिक आदिवासी दिनी नितीन बल्लाळ यांचा प्रकल्प अधिकारी यांच्याकडून सत्कार

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार कार्यालयाच्या प्रांगणामध्ये कार्यालयाच्या वतीने प्रकल्पांतर्गत येत असलेल्या विविध कर्मचारी व अधिकारी तथा सामाजिक कार्यकर्ते यांच्या कार्याचा गौरव म्हणून सत्कार करण्यात आले आहेत, यामध्ये जव्हार शहरातील रहिवासी आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प आश्रम शाळा विनवळ या ठिकाणी सेवेत असलेले नितीन बल्लाळ यांचा जागतिक आदिवासी दिनी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल प्रकल्प अधिकारी आयुशी सिंह यांच्या वतीने हरिश्चद्र भोये भाजपा आदिवासी आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांच्याकडून सत्कार करण्यात आला.

भारतीय बौद्ध महासभा कार्यात देखील बल्लाळ यांनी उल्लेखनीय कार्य केले असून सामाजिक पातळीवर त्यांना मिळालेल्या पुरस्काराने कौतुक करण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in