शुक्रवारी काही भागात पाणी नाही

१९ जानेवारी सकाळी ९ वाजल्यापासून ते शनिवारी, २० जानेवारी असा २४ तासांचा शटडाऊन घेण्यात येणार आहे.
शुक्रवारी काही भागात पाणी नाही

ठाणे : महापालिकेच्या स्वत:च्या योजनेच्या व मे. स्टेम प्राधिकरणाकडून शुक्रवार, १९ जानेवारी सकाळी ९ वाजल्यापासून ते शनिवारी, २० जानेवारी असा २४ तासांचा शटडाऊन घेण्यात येणार आहे. या शटडाऊन कालावधीत निगा देखभाल व दुरूस्तीमधील अत्यावश्यक कामे, टेमघर जलशुद्धीकरण केंद्र नवीन मोटर कंट्रोल पॅनल बसविणे व कळवा प्रभाग समिती अंतर्गत मुख्य जलवाहिनीवर कनेक्शन करणे इत्यादी तातडीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने ठाणे शहरातील घोडबंदर रोड, लोकमान्यनगर, वर्तकनगर, साकेत, ऋतुपार्क, जेल, गांधीनगर, रुस्तमजी, सिध्दांचल, इंदिरानगर, रुपादेवी, श्रीनगर, समतानगर, सिद्धेश्वर, इटर्निटी, जॉन्सन, मुंब्रा व कळव्याच्या काही भागातील पाणीपुरवठा २४ तासांसाठी बंद राहील. या शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पण्याचा योग्य तो साठा करून ठेवावा व महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in