कल्याणच्या उपनिबंधकासह पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांवर फसवणुकीचा गुन्हा

फसवणुकीत एकूण नऊ जण आरोपीच्या पिंजऱ्यात अडकले
कल्याणच्या उपनिबंधकासह पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांवर फसवणुकीचा गुन्हा

कल्याण : मृत व्यक्तीच्या नावे कल्याण पूर्व येथील रुक्मिणी देवी अपार्टमेंटमध्ये गाळा बनावट पॉवर ऑफ अथॉरिटी नोंदणीकृत नोटराईज करीत दोन जणांच्या नावे करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मृत इसमाच्या नातवाने या फसवणूक प्रकरणी कोळसेवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. या फसवणुकीत एकूण नऊ जण आरोपीच्या पिंजऱ्यात अडकले असून, दुय्यम निबंधकासह प्रभाग क्षेत्र अधिकारी यांच्यासह इतर अधिकारी व लिपिकांचा समावेश करण्यात आल्याने येथे खळबळ उडाली आहे.

विक्रम प्रकाश बनकर राहणार कोंढेरी टिटवाळा असे तक्रारदारांचे नाव असून त्यांच्या आजोबांचा कल्याण पूर्व येथील रुक्मिणी देवी अपार्टमेंटमध्ये गाळा अस्तित्वात असून, त्याचा पालिकेच्या मालमत्ता दप्तरी क्रमांक ५००८८९९०० असा आहे; मात्र चंद्रकांत नामदेव बनकर यांनी पालिकेचे अधिकारी तसेच दुय्यम निबंधक यांना हाताशी धरत आपसात संगनमत करीत गाळ्याची मालमत्ता अन्य दोन व्यक्तींच्या नावावर अनधिकृतपणे करण्यात आल्याचे उघड झाले आहे. याबाबत महानगरपालिका अधिनियमातील कराधान विषयानुसार मालमत्ता कर हस्तांतरणाकरिता करण्यात आलेली खरेदी विक्री कुळमुखत्यार बक्षीस पत्र हे दस्तावेज शासनाचे मुद्रांक शुल्क न भरलेले दस्त हे हस्तांतरणाकरिता नियमाने वैध ठरत नाही, असे संबंधित शासकीय अधिकाऱ्यांना माहिती असतानाही चुकीचा व बेकायदेशीर हस्तांतरणाचा वापर करीत अरुण पवार व त्यांची पत्नी मनीषा पवार यांचे नावे गाळा करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in