व्याजाच्या पैशांच्या परतफेडीवरून वृद्धाची आत्महत्या;सावकारास अटक

पैशांच्या व्याजाच्या परतफेडीवरून सावकाराच्या भीतीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना भिवंडीतून समोर आली
व्याजाच्या पैशांच्या परतफेडीवरून वृद्धाची आत्महत्या;सावकारास अटक
Published on

भिवंडी : ६१ वर्षीय वृद्धाने सावकाराकडून उसने घेतलेल्या पैशांच्या व्याजाच्या परतफेडीवरून सावकाराच्या भीतीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना भिवंडीतून समोर आली आहे. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात सावकाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक शंकर पाटील (६१) असे आत्महत्या केलेल्या वृद्धाचे नाव आहे. तर यशवंत मुगुटराव गायकवाड (५८) असे अटक केलेल्या सावकाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,अशोक हा काल्हेर येथील राजलक्ष्मी कमर्शियल कॉम्प्लेक्समध्ये राहत आहे. दरम्यान काही महिन्यांपूर्वी मयत अशोकने घरच्या कामानिमित्ताने यशवंतकडून व्याजी पैसे घेतले होते. त्यानंतर यशवंतने दिलेल्या पैशांच्या व्याजासाठी अशोककडे तगादा लावून धमकीही दिली होती. त्यामुळे अशोकने भीतीने ७ जानेवारी रोजी राहत्या घरात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात १२ जानेवारी रोजी सावकार यशवंतविरोधात पोऊनि संतोष शिंदे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोऊनि आशिष पवार करीत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in