शिवजयंतीनिमित्त डोंबिवलीत ॲड. असीम सरोदेंचे व्याख्यान

शिवजयंतीनिमित्त डोंबिवलीत ॲड. असीम सरोदेंचे व्याख्यान

डोंबिवलीतील सर्व चौकात बसून शहिदांच्या देशात धर्मावर राजकारण चालणार नाही, असे फलक लावण्यात येणार आहेत

डोंबिवली : सर्व राजकीय पक्षांचे आणि राजकीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या जागेसाठी इंडिया आघाडीने एकत्र येऊन कामाला लागल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची शाखेत व कार्यालयातच चर्चा न करता बैठक घेऊन कामाची दिशा ठरवित आहेत. शनिवारी डोंबिवलीत इंडिया आघाडीची बैठक पार पडली असून यात अनेक कामांच्या नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली. शिवजयंतीनिमित्त ॲड. असीम सरोदे यांचे व्याख्यान आयोजित केल्याचे या बैठकीत सांगण्यात आले.

शिवजयंतीनिमित्त ॲड. असीम सरोदे यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तर २३ मार्च रोजी शहीद दिनाच्या निमित्ताने देखील कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या आयोजन कसे करावे, यावर चर्चा करण्यात आली. डोंबिवली शहरात शिवसेना ठाकरे गटाने 'मतदारराजा हे मतदान तुझे शेवटचे मतदान ठरू नये. तुझे एक मत हुकूमशाही उलथविण्यासाठी' असा संदेश फलक लावल्याचेही विवेक खामकर यांनी यावेळी सांगितले.ॲड असीम सरोदे, ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे आणि त्यांचे काही सहकारी निर्भय बनो या नावाने एक कार्यक्रम करत आहेत. या कार्यक्रमात ते हुकूमशाही, लोकशाही, घटना, संविधान अशा अनेक मुद्यांना वाचा फोडत आहेत. डोंबिवलीतील इंडिया आघाडीकडून शिवजयंतीनिमित्त बाल भवन येथे ठेवलेल्या व्याख्यान कार्यक्रमात ॲड. असीम सरोदे व्याख्याते म्हणून येणार आहे. २३ मार्च रोजी होणाऱ्या शहीद दिनाच्या कार्यक्रमाचे देखील या इंडिया आघाडीच्या बैठकीत ठरविण्यात आले. या दिवशी डोंबिवलीतील सर्व चौकात बसून शहिदांच्या देशात धर्मावर राजकारण चालणार नाही, असे फलक लावण्यात येणार आहेत, असे ठरले आहे.

logo
marathi.freepressjournal.in