तानसा धरण भरण्याच्या वाटेवर, गाव, वाड्या-पाड्यांना दक्षतेचे आवाहन

तानसा धरण परिसरात सतत पर्जन्यवृष्टी होत असून, धरण परिसरातील सध्याचे पावसाचे प्रमाण लक्षात घेता तानसा धरण लवकरच भरून वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
तानसा धरण भरण्याच्या वाटेवर, गाव, वाड्या-पाड्यांना दक्षतेचे आवाहन
Published on

शहापूर : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शहापूर तालुक्यातील तानसा धरणाची पातळी १२७.५१ मिमी टीएचडी इतकी आहे. तानसा धरण ओसंडून वाहण्याची पातळी १२८.६३ मिमी टीएचडी इतकी आहे. तानसा धरण परिसरात सतत पर्जन्यवृष्टी होत असून, धरण परिसरातील सध्याचे पावसाचे प्रमाण लक्षात घेता तानसा धरण लवकरच भरून वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर तानसा धरणाखालील व तानसा नदीलगतच्या / आजूबाजूच्या परिसरातील शहापूर तालुक्यातील भावसे, मोहिली, वावेघर, अघई, टहारपूर, नवेरे, वेलवहाळ, डिंबा व खैरे, भिवंडी तालुक्यातील बोरशेती, एकसाल, चिंचवली, कुंडे, रावडी, अकलोली, वज्रेश्वरी, महाळुंगे व गणेशपुरी, वाडा तालुक्यातील निभावली, मेट, व गोरांड आणि वसई तालुक्यातील खानिवडे, घाटेघर, शिरवली, अदने, पारोल, अंबोडे, भटाणे, साईवान, काशीद कोरगाव, कोपरगाव, हेडावडे व चिमणे या गाव, वाड्या-पाड्यांमधील रहिवाशांनी याची नोंद घ्यावी, प्रशासन सर्व प्रकारच्या सुरक्षित उपाययोजनांसाठी सज्ज असून जनतेने प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम परदेशी यांनी केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in