देशी बनावटीचे रिव्हॉल्व्हर बाळगल्याप्रकरणी एकाला अटक

आरोपी भिवंडी तालुक्यातील गोव्यातील दादा पाटील यांच्या इमारतीत राहतो. तो मूळचा यूपीच्या बलिया जिल्ह्यातील गाझीपूर गावचा रहिवासी आहे.
देशी बनावटीचे रिव्हॉल्व्हर बाळगल्याप्रकरणी एकाला अटक

भिवंडी : नारपोली पोलिसांनी दापोडा पाइपलाईनजवळ ९ जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास एका संशयित व्यक्तीला अटक करून त्याच्याकडून ३० हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे रिव्हॉल्व्हर व जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.

राम आशिष जनार्दन पटेल (३२) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. दरम्यान त्याने शस्त्रास्त्र कोणत्या उद्देशाने बाळगल्याची कसून चौकशी नारपोली पोलिसांनी केली असता, त्याने भिवंडी तालुका आणि शांतीनगर पोलीस ठाण्यांतर्गत १० गुन्हे केले असून त्यामध्ये खून, दरोडा, जबरी चोरीचा समावेश असल्याचे समोर आले आहे. त्याच्यावर नारपोली पोलीस ठाण्यातही गुन्हे दाखल असल्याचे तपासात उघड झाले आहे.

आरोपी भिवंडी तालुक्यातील गोव्यातील दादा पाटील यांच्या इमारतीत राहतो. तो मूळचा यूपीच्या बलिया जिल्ह्यातील गाझीपूर गावचा रहिवासी आहे. नारपोली पोलिसांनी आरोपीविरुद्ध शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत आणि मुंबई पोलीस संहिता स्तंभाखाली गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. त्यास न्यायालयात हजर केले असता १४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी अधिक तपास सपोनि विजय मोरे करीत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in