अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी एकाला अटक

डोंबिवलीत एका आठ वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी एकाला अटक
Published on

डोंबिवली : डोंबिवलीत एका आठ वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या कुटुंबियांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गून्हा दाखल करून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वैभव जितेंद्र सिंग (१९) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी दोन विद्यार्थिनी ट्यूशनसाठी गेल्या होत्या. ट्यूशन टीचर क्लासमध्ये नव्हती, पण तिचा भाऊ जो गुन्ह्यात आरोपी आहे, तो घरी होता. त्याने परिस्थितीचा फायदा उचलून एका मुलीला बेडरूममध्ये घेऊन गेला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. घाबरलेल्या त्या पीडित मुलीने घरी आल्यावर या प्रकाराबाबत तिच्या आईला सांगितले. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.

याप्रकरणी मुलीच्या आईवडिलांनी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर वैभवला अटक केल्याचे पोलीस निरीक्षक राम चोपडे यांनी दिली आहे.

logo
marathi.freepressjournal.in