तोरंगण घाटातील विचित्र अपघातात एकाचा मृत्यू; २ आयशर, १ कार दरीत कोसळली

मोखाडा आणि त्र्यंबकेश्वर मार्गावर मोखाडा हद्दीत तोरंगण घाटातील अपघाती वळणावर सातत्याने अपघात होत असतात.
तोरंगण घाटातील विचित्र अपघातात एकाचा मृत्यू; २ आयशर, १ कार दरीत कोसळली

मोखाडा : मोखाडा आणि त्र्यंबकेश्वर मार्गावर मोखाडा हद्दीत तोरंगण घाटातील अपघाती वळणावर सातत्याने अपघात होत असतात. या धोकादायक ठिकाणी एक विचित्र अपघात झाला असून रविवारी रात्री एक ट्रक दरीत कोसळल्यानंतर तो ट्रक काढण्यासाठी ट्रकमालक आपल्या कारमधून अपघात ठिकाणी दाखल झाले.

यावेळी त्यांनी वळणाच्या जागेवर आपली कार लावली होती. त्याचवेळी आलेला दुसरा ट्रक कारसह थेट दरीत कोसळला. यामुळे अगोदरच त्या दरीत कोसळलेल्या ट्रकवर ही दोन्ही वाहने जावून आदळल्याने ट्रकचालक मुसा खान (३२) याचा मृत्यू झाला आहे.

मृत खान याचा मृतदेह ट्रकखाली फसल्याने अद्यापपर्यंत काढण्यात यश आले नसले तरी ग्रामस्थ आणि पोलिसांच्या मदतीने प्रयत्न सुरू आहेत. तोंरगण घाटातील हे ठिकाण अतिशय धोकादायक असून नाशिकवरून येताना मोखाडा हद्द सुरू होताच एक तीव्र उतार आहे. या ठिकाणी मोठे अपघाती वळण असतानाही कोणत्याही प्रकारचा धोक्याची सूचना देणारा फलक नसल्यामुळे वाहनचालकांना नाराजी व्यक्त केली आहे. अपघातग्रस्त तीव्र उतारावरील वळणावर कोणतीही उपाययोजना न करणाऱ्या विभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी आता सर्वसामान्य जनता करत आहे.

logo
marathi.freepressjournal.in