रोजगार हमी योजनेतील मजुरांची ऑनलाईन हजेरी घेतली जाणार

रोजगार हमी योजनेतील कामांमध्ये गैरप्रकार होत असल्याच्या अनेक तक्रारी होत आहेत
रोजगार हमी योजनेतील मजुरांची ऑनलाईन हजेरी घेतली जाणार

जव्हार तालुक्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील अकुशल कामगार आणि शेतमजुरांना आपल्या ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये रोजगार हमीचे माध्यमातून रोजगार पुरवण्यात येत असल्याने मजुरांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होत आहे, परंतु केंद्र सरकारच्या नव्या नियमानुसार रोजगार हमी योजनेतील २० पेक्षा जास्त मजुरांची संख्या असल्यास ऑनलाईन हजेरी घेतली जाणार असून,याकरिता दोन वेळा काम करतानाचे फोटो आता अपलोड करावे लागणार आहे, यामुळे बोगस मजुरांना आणि यंत्रांच्या साह्याने करण्यात येणाऱ्या कामांना रोक लागणार आहे.

रोजगार हमी योजनेतील कामांमध्ये गैरप्रकार होत असल्याच्या अनेक तक्रारी होत आहेत. या कामकाजात पारदर्शकता यावी म्हणून केंद्र शासनाने आता मजुरांची ऑनलाइन हजेरी लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार २० पेक्षा जास्त मजूर असणाऱ्या ठिकाणी हा नियम बंधनकारक राहणार आहे. या ठिकाणावरून दोन वेळा ऑनलाइन हजेरी पाठवावी लागेल. यानंतरच मजुरांची मजुरी मिळणार आहे.

बोगस मजुरांना आळा घालण्यासाठी उपाययोजना अनेक वेळा मशीनच्या मदतीने कामे करून कामावर मजूर असल्याचे दाखविले जाते. आता काम करणाऱ्या मजुरांचे दिवसातून दोन वेळा फोटो अपलोड केले जाणार आहे. यामुळे दिवसभरात किती काम पार पाडले आणि दुसऱ्या दिवशी किती काम झाले, याची सर्व माहिती रोजगार हमी योजनेच्या कार्यालयाला पाहता येणार आहे. यातून बोगस मजुरांना आळा बसेल.

नॅशनल मोबाइल सिस्टिम प्रणालीचे फायदे प्रत्यक्ष मजूर कामावर आहे की नाही ? हे काम कुठे सूरू आहे, परिसर कुठे आहे, अक्षांश आणि रेखांश या ठिकाणावर जाऊन मजुरांनी होत असलेल्या कामाचे फोटो काढायचे आहेत, याची संपूर्ण माहिती अक्षांश रेखांशमुळे जुळणार आहे

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in