गुंतवणूक करण्यास सांगून ऑनलाईन फसवणूक

सायबर गुन्हे कक्षाने सर्व प्रक्रिया पार पाडून तक्रारदार यांच्या मूळ खात्यावर ९७ हजार रुपये परत मिळवून दिले आहेत.
गुंतवणूक करण्यास सांगून ऑनलाईन फसवणूक
Published on

भाईंंदर : विविध स्कीममध्ये गुंतवणूक करण्यास सांगून ऑनलाईन फसवणूक करण्यात आलेल्या दोन वेगवेगळ्या प्रकरणातील रकमेपैकी १ लाख ८७ हजारांची रक्कम सायबर गुन्हे कक्षाने परत मिळवून दिली आहे.

मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील भाईंदर पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या प्रियांका उपाध्याय यांना हॉट्सॲपद्वारे गुंतवणूक स्कीम पाठवण्यात आली. या स्कीममध्ये त्यांना जास्त परतावा देण्याचे आमिष दाखूवन टेलीग्रामचे ग्रुपमध्ये अशा प्रकारे अनेक व्यक्तींना परतावा दिल्याचे दाखवण्यात आले. त्यानंतर बिट कॉईनमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून ९००२४ रु. ची फसवणूक झाल्याबाबत सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. सायबर गुन्हे कक्षाने आलेल्या तक्रारीची तात्काळ दखल घेऊन तक्रारदार यांच्या झालेल्या व्यवहाराबाबत माहिती प्राप्त करण्यात केली. तात्काळ पत्रव्यवहार करून व सातत्यपूर्ण पाठपुरावा करून नमूद फसवणूक रक्कम वाचविण्यात आली व माननीय महानगर दंडाधिकारी, ठाणे यांच्या आदेशाने ९० हजार २४ रुपये फसवणूक रक्कम तक्रारदार यांच्या खात्यावर परत मिळवून देण्यात आली.

दुसऱ्या घटनेत विरार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रियका पंकज भोईर यांची विविध टास्कमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून सुरुवातीला त्यांना काही रक्कम परत देऊन करून विश्वास संपादन केला व त्यानंतर मोठ्या रकमेची गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, याकरिता टेलीग्राम ॲपद्वारे टास्क पूर्ण करण्यास सांगून १ लाख ५९ हजार रुपयेची फसवणूक केल्याबाबत सायबर पोलीस ठाणे ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. सायबर गुन्हे कक्षाने सर्व प्रक्रिया पार पाडून तक्रारदार यांच्या मूळ खात्यावर ९७ हजार रुपये परत मिळवून दिले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in