कल्याण लोकसभा मतदार संघात ‘कमळ’च फुलणार

अनेक वर्षांपासून शिवसेना- भाजप युतीत लोकसभा शिवसेनेकडे तर विधानसभा भाजपकडे अशी तडजोड होती.
कल्याण लोकसभा मतदार संघात ‘कमळ’च फुलणार

कल्याण लोकसभा मतदार संघात शिवसेनेचा झेंडा फडकतो. खासदारकीच्या निवडणुकीत शिवसेनेने स्व.प्रकाश परांजपे, आनंद परांजपे आणि आता डॉ. श्रीकांत शिंदे हे चेहरे दिले. हे तिन्ही चेहरे ठाण्याचे असूनही जनतेने स्वीकारून मतदान केले. आता भाजपने याच २०२४ लोकसभा मतदार संघात भाजपचा उमेदवार उभा करणार असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे.

अनेक वर्षांपासून शिवसेना- भाजप युतीत लोकसभा शिवसेनेकडे तर विधानसभा भाजपकडे अशी तडजोड होती. शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांसह ४० आमदारांनी बंडखोरी करून भाजपशी हातमिळवणी करत ३० जून रोजी शिंदे सरकार स्थापन केले. भाजपचे मुंबई प्रदेश अध्यक्ष आशिष शेलार यांनी मुंबईत भाजपचा महापौर होणार, असे जाहीरपणे सांगितले होते.आता भाजपने महाराष्ट्रातील १६ लोकसभा मतदार संघात लोकसभा निवडणुकीत भाजपचा उमेदवार निवडणूक येण्यासाठी केंद्रीय मंत्री दौरा करणार आहेत, असे भाजपचे आमदार संजय केळकर यांनी डोंबिवलीत पत्रकार परिषदेत सांगितले.

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर कल्याण दौऱ्यावर ११, १२ व १३ सप्टेंबर असे तीन दिवस केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर हे कल्याण लोकसभा मतदार संघाचा दौरा करणार आहेत. याची माहिती देण्यासाठी भाजप आमदार केळकर यांनी डोंबिवलीतील भाजप ग्रामीण मंडळ कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी आमदार केळकर म्हणाले, लोकसभा मतदार संघात भाजपचा उमेदवार निवडणूक आणण्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून पक्षाचे काम सुरु आहे. भाजपला जिथे जिथे कमी मतदान पडले, तिकडे पक्षाकडून जोरदार काम सुरु आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in