पर्यावरण जनजागृतीकरीता सायकल रॅलीचे आयोजन

 पर्यावरण जनजागृतीकरीता सायकल रॅलीचे आयोजन
Published on

उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. राजा दयानिधी व अतिरिक्त आयुक्त डॉ. करुणा जुईकर, उप-आयुक्त (पर्यावरण) डॉ. सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शनाखालो पर्यावरण विभागाच्या विभागप्रमुख श्रीम, विशाखा सावंत, लिपीक श्री. सयाजी घाटविसावं याच्या नियोजनानुसार दिनांक ३ जुन. २०२२ रोजी जागतिक सायकल दिनानिमित्त महापालिका मुख्यालयापासुन गोल मैदान व शहाड स्टेशन पासुन परत महापालिका मुख्यालय या मार्गावरून पर्यावरण जनजागृतीकरीता सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

सदर सायकल रॅलीमध्ये २० सायकली, ०१ उदघोषण वाहनरिक्षा ०१ अम्ब्युलन्स व ०१ महापालिकेची गाडी असा ताफा होता. सायकल रॅलीद्वारे शहरातील नागरीकांना आपल्या शहरातील हवंची गुणवत्ता सुधारण्यासाठी तसेच पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी खाजगी वाहनांचा वापर कमीत कमी करावा आणि सार्वजनिक वाहनांचा वापर वाढवावा तसेच आठवडयातून किमान एकदातरी किंवा कमीत कमी अंतराचा प्रवास करणेसाठी सायकलचा वापर कराया असे आवाहन करण्यात आले आहे. सदर सायकल रॅलीमध्ये महापालिकेतील पर्यावरण विभागातील कर्मचारी तसेच श्रीम. प्राजक्ता कुलकर्णी, महापालिका सचिव, श्री. बाळ नेटके, मुख्य अग्निशमन अधिकारी/ मुख्य सुरक्षा अधिकारी व इतर सर्व विभागातील अधिकारी/कर्मचारी सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे पर्यावरण विभागाकडील परिपत्रकाद्वारे जागतिक सायकल दिनानिमित्त कार्यालयात सायकलचा वापर करून येणाऱ्या सर्व अधिकारी/कर्मचारी याचे पर्यावरण विभागातर्फे पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला.

logo
marathi.freepressjournal.in