उल्हासनगरमधील वाढते ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

एमपीसीबी आणि निरीच्या अहवालानुसार उल्हासनगर हे महाराष्ट्रातील सर्वाधिक ध्वनी प्रदूषित शहर आहे.
उल्हासनगरमधील वाढते ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन
Published on

उल्हासनगरमधील वाढते ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी उल्हासनगरचे वरिष्ठ डॉक्टर आणि हिराली फाऊंडेशन यांच्या संयुक्त प्रयत्नाने पाच ऑगस्ट २०२२ रोजी उल्हासनगर कॅम्प -४ येथील प्रसिद्ध आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये ध्वनिप्रदूषणाविरुद्ध जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

एमपीसीबी आणि निरीच्या अहवालानुसार उल्हासनगर हे महाराष्ट्रातील सर्वाधिक ध्वनी प्रदूषित शहर आहे. ही अतिशय गंभीर बाब असून शहरवासीयांचे या या गंभीर मुद्द्याकडे लक्ष वेधणे अत्यावश्यक आहे त्यामुळे या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे हिराली फाउंडेशनच्या अध्यक्षा सरिता खानचंदांनी यांनी यावेळी सांगितले. शहरातील डॉक्टरांसोबतच या जनजागृतीच्या या कार्यक्रमात काही शाळांचे मुख्याध्यापकही सहभागी झाले होते. डॉ. श्रीकांत देशपांडे, ईएनटी तज्ज्ञ डॉ. गोकुळदास अहिरे, उल्हासनगर डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजू उत्तमानी, डॉ. विलास चौधरी, हिराली फाउंडेशनचे सह सल्लागार ऍड. पुरुषोत्तम खानचंदानी , हिराली फाउंडेशनच्या अध्यक्षा सरिता खानचंदानी, विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, यशवंत विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रमोद नेहते, प्रल्हाद कोलते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

logo
marathi.freepressjournal.in