अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद उबाळे यांनी वृक्षारोपण करून या कार्यक्रमाचे उद्घाटन केले
अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन

वसई येथील विद्यावर्धिनी शिक्षण संस्था संचालित अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

माजी मुख्यमंत्री व राज्यातील हरितक्रांतीचे जनक माननीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रात कृषिदिन साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून अण्णासाहेब वर्तक महाविद्यालय व स्टेट बँक ऑफ इंडिया, वसई शाखा यांच्या संयुक्त विदयमाने वर्तक महाविद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद उबाळे यांनी वृक्षारोपण करून या कार्यक्रमाचे उद्घाटन केले व वृक्षारोपणासह वृक्षसंवर्धन करणे हीसुद्धा आपली सर्वांची जबाबदारी आहे असा संदेश प्राचार्यांनी स्वयंसेवकांना दिला. या कार्यक्रमांतर्गत विदयार्थी स्वयंसेवकांनी महाविद्यालयाच्या आवारात आंबा, जांभुळ, अर्जुन, पिंपळ अशी अनेक देशी झाडे लावली.

या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख भीमराव पेटकर, भारती तोरणे व आदिती यादव यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. राष्ट्रीय सेवा योजनेचे माजी स्वयंसेवक शुभम राय व सुनील बिंद यांच्यासह इतर विद्यार्थी स्वयंसेवकांनी उत्साहात वृक्षारोपण केले व या वृक्षांच्या देखभालीचा निश्चय केला.

वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अनिलकुमार शेळके व डॉ. जानकी सावगाव, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या सौ. स्वाती जोशी, IQAC समन्वयक डॉ. दीपा कत्रे, मराठी विभाप्रमुख डॉ. शत्रुघ्न फड यांच्यासह विविध विभागांतील प्राध्यापकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in