साथीच्या आजारांनी तालुक्यातील नागरिक त्रस्त,डेंग्यू, लेप्टोचे वाढते रूग्ण

सरकारी आरोग्य विभाग सलाईनवर असतांना मात्र खाजगी दवाखाण्यांना जत्रेचे स्वरूप आले आहे.
साथीच्या आजारांनी तालुक्यातील नागरिक त्रस्त,डेंग्यू, लेप्टोचे वाढते रूग्ण

कोरोना महामारीतून अात्ताशी कुठे नागरिकांनी सुस्कारा सोडला असतांना साथीच्या रोगांनी तालुक्यावर आपली वक्र दृष्टी वळविली आहे.

वाड्या पाड्यावर थंडी, ताप, सर्दी यासारख्या साथीच्या आजारांनी डोकं वर काढले आहे. आजाराने संपुर्ण तालुका तडफडत असतांना मात्र शासकीय आरोग्य सेवा सुस्तावल्या आहेत. अद्यापही खेड्यापाड्यांमध्ये आरोग्य विभागाने कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना सुरू केलेल्या नाही आहेत. तालुक्यात वाड्या,पाड्यावर घरोघरी थंडीताप ते डेंग्युसदृश्य रूग्ण आढळून आले आहेत. सरकारी आरोग्य विभाग सलाईनवर असतांना मात्र खाजगी दवाखाण्यांना जत्रेचे स्वरूप आले आहे.

गोरगरीब रुग्णांची खासगी दवाखाण्यात मोठ्या प्रमाणात लुट होत आहे यामुळे ग्रामीण भागातील नागरिक पाउस आणि आजार या दोन्ही गोष्टींशी लढत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. गोरगरीब रूग्णांची आर्थिक स्थीती आधीच बिकट असतांना त्यांच्यावर खासगी रूग्णालयात होणारी लुट थांबण्यासाठी शासकीय आरोग्य सेवा गावोगावी पोहचणे गरजेचे आहे. मात्र तसेकाही होताना दिसून येत नसल्याने आरोग्य विभाग रुग्णाच्या जिवीताशी खेळ तर करीत नाही ना असा प्रश्न नागिरकांमध्ये उपस्थित झाला आहे.

वाघिवली गावातील ९ रूग्णांना डेंग्यू व लेप्टो झाल्याचे निदर्शनास आले अाहे. यातील दर्शना दशरथ विशे या महिलेचा खासगी रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची घटन नुकमाच घडली.

तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. श्रीधर बनसोडे यांनी आरोग्य जाउन डेंग्यू, मलेरियाचे रूग्ण शोधून त्यांच्यावर उपचार करण्याचे आदेश दिले असले तरी याची अमंलबजावणी मात्र हाेत नसल्याचे म्हटले जात अाहे. मागील महिन्यापासुन पावसाला सुरूवात झाली असली तरी तुरळक पाऊस पडत असल्यामुळे साथीच्या रोगांनी डोके वर काढले अाहे. यामध्ये थंडीताप, मलेरिया, सर्दी, डेग्यू व लेप्टोचे रूग्ण सापडल्याने स्थानिकामंध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

वाघिवली गावात चार तर माळशेज घाटालगतच्या केळेवाडी वाल्हीवरे येथे पाच रूग्ण सापडल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. श्रीधर बनसोडे यांनी दिली.

मात्र शासकीय रूग्णात उपचार योग्यरीतीने हाेत नसल्यामुळे अनेक नागरिक खासगी रूग्णालयाची वाट धरत असतात त्यामुळे त्यांची आकडेवारी शासकीय पटलावर नसते. यामुळे मुरबाड तालुक्यातील खेड्या पाड्यात शासकीय आरोग्य यंत्रणा पोहचत नसल्यामुळे ही आकडेवारी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in