पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे भातशेती अडचणीत

पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या भातरोपांचे नुकसान केले आहे.
पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे भातशेती अडचणीत

पालघर जिल्ह्यात सलग दोन दिवस मुसळधार पावसामुळे भातशेती अडचणीत आली आहे. पालघर जिल्ह्यात वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, तलासरी, डहाणू, पालघर वसई या तालुक्यात जोरदारपणे मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पालघर जिल्ह्यात भातपिक लागवडी क्षेत्र हे ७४ हजार ८०० हेक्टर आहे. शेतकरी वर्गाची संख्या ही १ लाख ४५ हजार आहे.

पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या भातरोपांचे नुकसान केले आहे. मुसळधार पावसाने भातरोपे कुजण्याची भिती व्यक्त करण्यात येते. वाडा तालुक्यातील विनायक पाटील यांच्या भातरोपांचे नुकसान या पावसामुळे होण्याच्या मार्गावर आहे. जिल्ह्यात भात उत्पादक शेतकरी वर्गाने भात बियाण्यांची पेरणी केली आहे. मात्र या पावसामुळे शेतात पाणी साचल्याने ते कुजण्याची भिती व्यक्त केली जातेय.

वाडा तालुक्यात पावसाची मंडळनिहाय आकडेवारी वाडा १२१ मिमी. कंचाड ११२ मिमी. कुडुस १६९मिमी.कोने १४१ मिमी. असे एकुण ५४३ मिमी पावसाने हजेरी तालुक्यात हजेरी लावली आहे.

या मुसळधार पावसाने पालघर जिल्ह्यातील सागरी किनारपट्टी भागात असलेल्या घरवस्तीत पाणी शिरले आहे. तेथील रहिवासीयांना सुरक्षित ठिकाणी हळविण्यासाठी एनडीआरएफच्या टिम मागविण्यात आली.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in