दुर्गम भागासाठी मानधनातून रुग्णवाहिका; माकपचे आमदार विनोद निकोले यांचे दायित्व

शिवजयंतीच्या निमित्ताने व सायवन गट आयोजित 'आमदार चषक महोत्सव २०२४' बक्षीस समारंभाच्या दिवशी रुग्णवाहिका सुपूर्द केली
दुर्गम भागासाठी मानधनातून रुग्णवाहिका; माकपचे आमदार विनोद निकोले यांचे दायित्व

पालघर : डहाणू तालुक्यातील दुर्गम भागातील गावांना तत्काळ उपचार मिळण्यासाठी डहाणूचे आमदार विनोद निकोले यांनी स्वतः च्या मानधनातून रुग्णवाहिका विकत घेऊन दिली. तिचे लोकार्पण आमदार विनोद निकोले यांनी सोमवारी केले. शिवजयंतीच्या निमित्ताने व सायवन गट आयोजित 'आमदार चषक महोत्सव २०२४' बक्षीस समारंभाच्या दिवशी रुग्णवाहिका सुपूर्द केली.

डहाणू तालुक्यातील सायवन, गांगोडी, कन्हवली, चळणी, दाभाडी, दिवशी गडचिंचले, निंबापुर, बापुगाव, धरमपुर, कोसेसरी, भोवाडी अशा ठिकाणी गरोदर माता, आजारी माणसं यांना वेळेवर रुग्णवाहीका भेटत नसल्यामुळे गेल्या कित्येकवर्षांपासून गावकऱ्यांची रुग्णवाहिकेची मागणी होती. म्हणून सायवन सरपंच विष्णू बोरसा, शेणसरी सरपंच साधना बोरसा यांच्या हस्ते रुग्णवाहिका सुपूर्त करण्यात आली. याप्रसंगी ठाणे पालघर किसान सभा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत घोरखना, कुशल राऊत, विकी कुवरा व मोठ्या संख्येने गावकरी व खेळाडू उपस्थित होते.

logo
marathi.freepressjournal.in