पालघर नगरपरिषदेचे वराती मागून घोडे! ओल्या व सुक्या कचऱ्याचे विलगीकरण करण्यास आता सुरुवात

कचरा संकलन करणाऱ्या एन. एच. पटेल कंपनी व आदर्श सर्विसेस या ठेकेदारांना वार्षिक ५० लाखाहून अधिकचा ठेका दिला आहे.
पालघर नगरपरिषदेचे वराती मागून घोडे! ओल्या व सुक्या कचऱ्याचे विलगीकरण करण्यास आता सुरुवात
PM

वाडा : ओला व सुका कचराच्या विलगीकरण करण्याची व्यवस्था पालघर नगरपरिषदेत नसल्याने सरसकट कचरा हा डम्पिंग ग्राउंड मधेच साठविला जात होता. कचऱ्याच्या विलगीकरणासाठी लाखो रुपयांच्या मशीन वापरविना पडून होत्या. आज पालघर नगरपरिषदेला जाग आली असून, ओल्या व सुक्या विलगिकरणासाठी सुरुवात करण्यात आली आहे.  दुरुस्तीसाठी पाठवण्यात आलेल्या मशीन लवकरच वापरात आणल्या जातील, असे नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाने म्हटले आहे.

पालघर नगरपरिषदेच्या डम्पिंग ग्राऊंडमध्ये ओला व सुका कचरा साठवण्याची व्यवस्था अपुरी असल्याची बाब समोर आली होती. ओला व सुका कचराच्या विलगीकरण करण्याची व्यवस्था नसल्याने सरसकट कचरा डम्पिंग ग्राउंड मधेच साठविला जात होता. कचऱ्याच्या विलगीकरणासाठी लाखो रुपयांच्या मशीन वापरविना पडून होत्या. पालघर शहरातून ३५ मेट्रिक टन कचरा दरदिवशी उचलण्यात येतो. यामध्ये १५ मेट्रिक टन ओला आणि १८ मेट्रिक टन सुका व अन्य २ मेट्रिक टन असा एकूण कचरा ३५ मेट्रिक टन मिश्रित कचरा उचलण्यात येतो. ओला व सुका कचरा असा मिश्रित कचरा विलगीकरण होत नसल्याने कचऱ्याचे विलगीकरण करण्यात येत नव्हते. नगरपरिषदेच्या हद्दीत शहरात दररोज ३५ मेट्रिक टनचा जवळपासचा कचरा निर्माण होतो. ओला व सुका मिश्रित सरसकट कचरा पालघर शहरातिल डम्पिंग ग्राऊंडमध्ये साठविला जात होता.

कचरा संकलन करणाऱ्या एन. एच. पटेल कंपनी व आदर्श सर्विसेस या ठेकेदारांना वार्षिक ५० लाखाहून अधिकचा ठेका दिला आहे. या ठेकेदारकडून एक व दोन टनाच्या २० घंटा गाड्या ओला व सुका कचरा उचलण्यासाठी लावण्यात आल्या आहेत.  कचरा विलगिकरणासाठी पालघर नगरपरिषदेने बोईसर येथील मे. डी जी वेस्ट मॅनेजमेंट सर्विसेस कंपनीला ठेका दिला असून,  दरवर्षी एक कोटी ३५ लाख ३४ हजार ७४८ रुपयांचा ठेका या कंपनीला कचरा विलगिकरण व आदी तत्सम कामांसाठी दिला असल्याचे सांगण्यात येते.

logo
marathi.freepressjournal.in