वसईत सुक्या मासळीच्या नुकसानीचे पंचनामे सुरू

पंचनामे झाल्यानंतर नुकसानभरपाईकरिता शासनाकडे प्रस्ताव पाठवले जातील, असे तहसीलदार अविनाश कोष्टी यांच्याकडून सांगण्यात आले.
वसईत सुक्या मासळीच्या नुकसानीचे पंचनामे सुरू

वसई : राज्यभरात झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या हानीचे पंचनामे सुरू असतानाच कोळी युवाशक्ती संघटनेच्या पाठपुराव्याने तहसील कार्यालयातून वसईतील मच्छिमारांच्या सुक्या मासळीच्या झालेल्या नुकसानीची पाहणी सुरू झाली आहे. आतापर्यंत दीडशेहून अधिक पंचनामे झाले असून, अजूनही ही प्रक्रिया सुरू आहे. पंचनामे झाल्यानंतर नुकसानभरपाईकरिता शासनाकडे प्रस्ताव पाठवले जातील, असे तहसीलदार अविनाश कोष्टी यांच्याकडून सांगण्यात आले.

गेल्या रविवार आणि सोमवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे माध्यमांमध्ये शेतकर्‍यांच्या नुकसानीची चर्चा सुरू होती. मुख्यमंत्र्यांनीही शेतकर्‍यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना निर्गमित केल्या होत्या. त्याच वेळी मत्स्यदुर्भीक्ष्यामुळे मेटाकुटीस आलेल्या मच्छिमार समाजाकडे मात्र शासनाचे दुर्लक्ष झाल्याची स्थिती होती. पाचूबंदर-किल्लाबंदर येथील कोळी युवाशक्ती संघटनेचे अध्यक्ष मिल्टन सौदिया यांनी तहसीलदार अविनाश कोष्टी यांची भेट घेऊन सुक्या मासळीच्या हानीकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते.

logo
marathi.freepressjournal.in