
नवी मुंबई : चिकन आणण्यासाठी गेलेल्या एका १० वर्षीय मुलीसोबत ६३ वर्षीय अंडी विक्रेत्याने अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. सफाउल इद्रिसमियाँ अन्सारी (६३) असे या अंडी विक्रेत्याचे नाव असून पनवेल तालुका पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
या घटनेतील १० वर्षीय पीडित मुलगी पनवेल तालुक्यातील खारपाडा भागात राहण्यास आहे. पीडित मुलगी खारपाडा नाका येथील दुकानातून चिकन आणण्यासाठी गेली होती. पण दुकानदार नसल्याने पीडित मुलगी दुकानदाराची वाट पाहत त्याच ठिकाणी उभी होती. याचवेळी चिकन दुकानाशेजारी असलेल्या अंडी विक्रेता सफाउल अन्सारीने पीडित मुलीला दुकानात बोलावून तिच्यासोबत अश्लील चाळे केले. यावेळी पीडित मुलीने आरडाओरड करून पलायन केले.