ठाण्यात पोपटांची तस्करी करणाऱ्याला अटक

पोपट किती जणांना विकले आहेत, याबाबत वनविभाग अधिक तपास करत आहे.
ठाण्यात पोपटांची तस्करी करणाऱ्याला अटक
Published on

ठाणे : अवैधरित्या तब्बल नऊ पोपट घरात ठेवणाऱ्या एका तस्कराला ठाणे वनविभागाच्या दक्षता पथकाने मंगळवारी अटक केली. तस्कराच्या घरातील नऊ पोपटांपैकी चार पोपट प्रजननादरम्यान त्यांचा रंग बदलला असल्याचे कृती पथकातील सहभागी मानद वन्यजीव संरक्षक रोहित मोहिते यांनी सांगितले. तसेच अशा जातीचे पोपट घरात ठेवणे गुन्हा असल्याची माहिती वनविभागाचे प्रादेशिक अधिकारी मुकेश सणस यांनी दिली. या तस्कराच्या साथीदारांचा शोध सुरू असून, हे पोपट आणखी किती जणांना विकले आहेत, याबाबत वनविभाग अधिक तपास करत आहे.

logo
marathi.freepressjournal.in