
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संघटनात्मक ताकदीवर विश्वास ठेवून डोंबिवलीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुमारे 11 पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्त्यांनी बुधवारी ठाकरे गटात जाहीर प्रवेश केला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मातोश्रीवर शिवबंधन बांधण्यात आले
राष्ट्रवादीतील राहुल चौधरी, राजेंद्र नांदोस्कर, जगदीश ठाकूर, प्रशांत शिंदे, शैलेश गवळी, अर्जुन भाटी, देवा चुडनाईक, रतन चव्हाण, राजेंद्र चौधरी, रोहित चौधरी, अभिषेक खामकर, संजय पाटील, प्रदीप तेरसे, मधू शेळके, या पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्त्यानी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी ठाकरे गटाचे नेते सुभाष भोईर, खासदार अरविंद सावंत,शिवसेना उपनेते अरुण दुधवडकर, कल्याण जिल्हा प्रमुख सदानंद थरवळ, अभिजित सावंत,नरेंद्र म्हात्रे, राहुल भगत आदी उपस्थित होते.