कल्याण-मुरबाड माळशेज घाटातील अरुंद रस्त्यामुळे प्रवासी झाले त्रस्त

डोंगराळ भाग आणि खाली वेडीवाकडी अरुंद वळणे यामुळे प्रवाशांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
कल्याण-मुरबाड माळशेज घाटातील अरुंद रस्त्यामुळे प्रवासी झाले त्रस्त

नाणेघाटापासून, सिध्दगडापर्यंत माळशेज घाट निसर्गरम्य अभयारण्याचा परिसर आजही इतिहासाची साक्ष देतो. घाटातील रस्त्यावरील वेडीवाकडी वळणे तसेच अरुंद रस्त्यामुळे अपघाताला वाहनचालक त्रस्त झाले आहेत. त्याचप्रमाणे एकाच वेळी दोन गाड्या ये-जा करू शकत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची शक्यता वाहन चालकांनी केली असून याकडे लक्ष घालण्याची विनंती वाहन चालकांनी प्रशासनाकडे केली आहे.

शिवनेरी, ओतूर, आळेफाटा, अहमदनगर, पुणे याकडे जाणारा कल्याण-मुरबाड टोकावडा माळशेज घाट रस्ता म्‍हणजे एकीकडे पर्यटण दुसरीकडे दुर्घटना या रस्त्यापैकी घाटमाथाचा रस्ता मोठया प्रमाणात वनविभागाच्या हद्दीत आहे. प्रचंड उंचीचा घाट डोंगराळ भाग आणि खाली वेडीवाकडी अरुंद वळणे यामुळे प्रवाशांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

पावसाळ्यात घाट आणि दरडी याबाबत कोणीही शाश्वती देऊ शकत नाही त्यामुळे प्रवासी, वाहन चालक जपून तसेच नशिबाच्या जीवावर उदार होऊन प्रवास करत असतात. या घाटातील रस्ता अरूंद असल्यामुळे दोन वाहने एकाच वेळी जाऊ शकत नाही. हा वेडीवाकडी वळणाचा माळशेज घाट कल्याण अरुंद रस्ता अपघाती रस्ता म्हणूनच ओळखला जातो. या रस्त्यासाठी शासनाने आतापर्यंत प्रचंड खर्च केला असून प्रशासन, लोकप्रतिनीधी आणि ठेकेदार यांनी तितकाच आर्थिक फायदाही घेतला. कधी इथून रेल्वे जाणार म्हणे, कधी काचेचा पूल, कधी नॅशनल हायवे, कधी नाणेघाट - नवी मुंबई रस्ता अशा अने‍क घोषणा वाऱ्यावर गेल्या आहे. येथील अरुंद वळणे आपघात पॉईंट बनली आहेत.

दररोज दिवस भरात या रस्त्यावरून लाखांच्यावर वाहनांची वाहतूक होत असते. कल्याणपासून माळशेजघाट - मुरबाड हद्दीपर्यंत १०० किलोमीटरचा प्रवास आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in