पाटोळे लाच प्रकरणात तक्रारदारांना धमकी; ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

दुपारी ३.४८ वाजता तक्रारदारांच्या मोबाईलवर अनोळखी क्रमांकावरून फोन आला. समोरील इसमाने हिंदी भाषेत 'ऑफिसमध्ये घुसून ठार मारेन' अशी धमकी दिली. त्यानंतर पुन्हा कॉल करून त्याने 'आत्तापर्यंत जे काही केले ते विसरा...
पाटोळे लाच प्रकरणात तक्रारदारांना धमकी; ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Published on

ठाणे : ठाणे महानगरपालिकेतील निलंबित उपायुक्त शंकर पाटोळे यांच्या लाचखोरी प्रकरणाला नवे कलाटणीकारक वळण मिळाले आहे. या प्रकरणातील तक्रारदारांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) कार्यालयात असतानाच जीवे मारण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, धमकीचा कॉल रेकॉर्ड झाला असून या प्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २ ऑक्टोबर रोजी नौपाडा पोलीस ठाण्यात शंकर पाटोळे यांच्याविरोधात लाचखोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास एसीबीचे अप्पर पोलीस अधीक्षक सुभाष शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. तपासाच्या अनुषंगाने १६ ऑक्टोबर रोजी तक्रारदारांना सकाळी एसीबी कार्यालयात बोलावण्यात आले होते. दरम्यान, दुपारी ३.४८ वाजता तक्रारदारांच्या मोबाईलवर अनोळखी क्रमांकावरून फोन आला. त्यावेळी ते तपास अधिकाऱ्यांशी चर्चेत असल्याने कॉल घेतला गेला नाही. काही क्षणांनी पुन्हा कॉल आल्यावर समोरील इसमाने हिंदी भाषेत 'ऑफिसमध्ये घुसून ठार मारेन' अशी धमकी दिली. त्यानंतर पुन्हा कॉल करून त्याने 'आत्तापर्यंत जे काही केले ते विसरा, नाहीतर थेट जीव जाईल,' असे पुनःपुन्हा सांगितले.

तक्रारदारांच्या मोबाईलवरील ऑटो कॉल रेकॉर्डिंगमुळे हे संभाषण रेकॉर्ड झाले. त्यांनी तत्काळ हा ऑडिओ तपास अधिकारी शिंदे यांना ऐकवला. घटनेचे गांभीर्य लक्षात अधिकाऱ्यांच्या घेऊन वरिष्ठ निर्देशानुसार ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in