उल्हासनगरमध्ये ड्रोन माध्यमातून पेट्रोलिंग; विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष सुरक्षा मोहीम

विधानसभा निवडणुकीच्या काळात कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी उल्हासनगर पोलीस ठाण्याने अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहारा घेत शहराच्या सुरक्षेत वाढ केली आहे. ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या आदेशानुसार आणि पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उल्हासनगरातील बिर्ला गेट, शहाड जकात नाका आणि शहाड ब्रिज परिसरात ड्रोन पेट्रोलिंगसह नाकाबंदी तपासणी मोहीम राबवण्यात आली.
उल्हासनगरमध्ये ड्रोन माध्यमातून पेट्रोलिंग; विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष सुरक्षा मोहीम
Published on

उल्हासनगर : विधानसभा निवडणुकीच्या काळात कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी उल्हासनगर पोलीस ठाण्याने अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहारा घेत शहराच्या सुरक्षेत वाढ केली आहे. ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या आदेशानुसार आणि पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उल्हासनगरातील बिर्ला गेट, शहाड जकात नाका आणि शहाड ब्रिज परिसरात ड्रोन पेट्रोलिंगसह नाकाबंदी तपासणी मोहीम राबवण्यात आली. संध्याकाळी ५ ते ६ या वेळेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली, वाहतूक निरीक्षक अविनाश भामरे आणि एस.एस.टी. पथकातील सहकारी अमलदार यांच्या उपस्थितीत ही मोहीम सुरू करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या विशेष मोहिमेत ड्रोन कॅमेराचा वापर करून परिसरातील सर्व हालचालींवर नियंत्रण ठेवण्यात आले. ड्रोनच्या सहाय्याने वाहने आणि वाहनचालक यांच्या हालचालींवर नजर ठेवण्यात येणार आहे. दूर अंतरावरून देखील ड्रोनच्या माध्यमातून पोलीस कर्मचाऱ्यांना परिसरात होणाऱ्या संशयास्पद हालचालींवर लक्ष देता येणार आहे. वाहनांमध्ये लपवून ठेवलेली अवैध दारू, बेकायदेशीर कॅश आणि इतर बेकायदेशीर वस्तू शोधण्यात ड्रोन कॅमेऱ्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

बिर्ला गेट, शहाड जकात नाका आणि शहाड ब्रिज भागात केलेल्या नाकाबंदी दरम्यान एस.एस.टी. पथकाने वाहनांची कसून तपासणी केली. अवैध वस्तूंचा वापर टाळण्यासाठी ड्रोन पेट्रोलिंगच्या माध्यमातून मिळालेल्या संशयास्पद हालचालींची माहिती त्वरित मिळत होती. तसेच, वाहनचालकांकडून कोणताही बेकायदेशीर वापर केला जात आहे का? यावर लक्ष ठेवण्यात आले. यामुळे निवडणुकीत अवैध दारू, रोख रक्कम, आणि इतर बेकायदेशीर वस्तूंचा वापर होण्यास प्रतिबंध होणार आहे.

नागरिकांकडून प्रशंसा

या मोहिमेने शहरातील नागरिकांमध्ये पोलीस दलाबद्दल विश्वास वाढवला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पोलीस प्रशासनाने निवडणूक काळात शहरात सुरक्षेसाठी घेतलेल्या या पावलांची सर्वत्र प्रशंसा होत आहे. अनेकांनी ड्रोन पेट्रोलिंगला समर्थन देत, शहराच्या कायदा-सुव्यवस्थेसाठी पोलीस दल सज्ज असल्याचे समाधान व्यक्त केले आहे. उल्हासनगर पोलीस दलाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून निवडणुकीत अवैध वस्तूंचा वापर आणि गैरप्रकारांवर नियंत्रण ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. शहरातील शांतता आणि सुरक्षितता कायम ठेवण्यासाठी पोलीस दलाच्या या नव्या पद्धतीची नागरिकांमध्ये सकारात्मक प्रतिक्रिया उमटली आहे.

logo
marathi.freepressjournal.in