कल्याण : कारवाईविरोधात आयुक्तांच्या घरासमोर दिव्यांगांचा ठिय्या

कल्याणमध्ये विकासकामांचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांनी रस्त्यालगत फुटपाथवर असलेल्या दिव्यांगांच्या टपऱ्या हटवण्याची कारवाई रविवारी केली.
कल्याण :  कारवाईविरोधात आयुक्तांच्या घरासमोर दिव्यांगांचा ठिय्या

कल्याण : कल्याणमध्ये विकासकामांचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांनी रस्त्यालगत फुटपाथवर असलेल्या दिव्यांगांच्या टपऱ्या हटवण्याची कारवाई रविवारी केली. या कारवाईच्या निषेधार्थ दिव्यांग बांधवांनी महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन केले.

ही कारवाई आयुक्तांच्या आदेशानुसार करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र मुख्यमंत्री हे चांगले काम करीत असताना त्यांना बदनाम करण्यासाठी त्यांचे नाव वापरून ही कारवाई केली जात असल्याचे अपंग महासंघाचे अध्यक्ष अशोक भोईर यांनी सांगितले. आमच्या टपऱ्या अधिकृत असून महापालिकेच्या अनुदानातून त्या उभारण्यात आल्या आहेत.

दिव्यांग बांधव कुठे भीक न मागता टपरीमध्ये व्यवसाय करत स्वाभिमानाने जीवन जगतात. मुख्यमंत्र्यांच्या नावाखाली केलेली ही कारवाई अन्यायकारक आहे, महापालिका आयुक्तांनी तत्काळ ही कारवाई थांबवावी अन्यथा आंदोलन सुरू राहील, असे भोईर यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in