Bhiwandi : क्षुल्लक वादातून पेट्रोल पंपावरील कामगाराची हत्या; तिघांना निजामपूर पोलिसांकडून अटक

भिवंडी शहरात १८ सप्टेंबर रोजी दोन हत्येच्या घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
Bhiwandi : क्षुल्लक वादातून पेट्रोल पंपावरील कामगाराची हत्या; तिघांना निजामपूर पोलिसांकडून अटक
Bhiwandi : क्षुल्लक वादातून पेट्रोल पंपावरील कामगाराची हत्या; तिघांना निजामपूर पोलिसांकडून अटक
Published on

भिवंडी : भिवंडी शहरात १८ सप्टेंबर रोजी दोन हत्येच्या घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. वंजारपट्टी नाका परिसरातील मिलन पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या राजेश अनिल शुक्ला (३४) या कामगाराची त्याच्यासोबत काम करणाऱ्या तिघांनी क्षुल्लक वादातून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी निजामपूर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश शुक्ला हा मिलन पेट्रोल पंपावर काम करत होता आणि पंपावरील खोलीत राहत होता. १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी त्याचा सहकारी उत्सव देवेंद्र चतुर्वेदी, संदीप ओमप्रकाश उपाध्याय आणि कलाम अब्दुल अन्सारी यांच्याशी क्षुल्लक कारणावरून वाद होऊन हाणामारी झाली होती.

या वादाचा राग मनात ठेवून तिघांनी राजेश खोलीत झोपलेला असताना त्याच्यावर हल्ला केला. लाथाबुक्क्यांनी तसेच दांडक्याने केलेल्या मारहाणीत राजेशचा मृत्यू झाला. त्यानंतर हत्येची घटना लपविण्यासाठी आरोपींनी मृतदेह पेट्रोल पंपाच्या मागील बाजूस लपविण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांनी सांगितले.

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास डगळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आला. चौकशीत संशयितांची नावे समोर आल्यानंतर तिघांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in