ठाणे-भाईंदरमध्ये पॉड टॅक्सीचा पायलट प्रोजेक्ट राबवणार; परिवहन मंत्री ‌प्रताप सरनाईक यांची माहिती

ठाणे शहरातील वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी भविष्यात स्वयंचलित पॉड टॅक्सी प्रकल्प अनिवार्य ठरणार आहे.
ठाणे-भाईंदरमध्ये पॉड टॅक्सीचा पायलट प्रोजेक्ट राबवणार; परिवहन मंत्री ‌प्रताप सरनाईक यांची माहिती
Published on

ठाणे : ठाणे शहरातील वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी भविष्यात स्वयंचलित पॉड टॅक्सी प्रकल्प अनिवार्य ठरणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रायोगिक तत्त्वावर घोडबंदर मार्गावरील भाईंदर पाडा मेट्रो स्टेशन ते विहंग हिल्स सर्कलपर्यंत पॉड टॅक्सीचा पायलट प्रोजेक्ट राबवण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. ते ठाणे महापालिकेच्या क्षेत्रातील विविध विकास कामाच्या आढावा बैठकी प्रसंगी बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली न्यूट्रॉन ईव्ही मोबिलीटी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी मार्फत बडोदा येथे चाचणी स्वरूपात स्वयंचलित उन्नत पॉड टॅक्सीचा प्रकल्प राबवला जात आहे. गुजरात दौऱ्यावर असताना या प्रकल्पाला सरनाईक यांनी भेट देऊन त्याची पाहणी केली होती.

logo
marathi.freepressjournal.in