पोखरण अणुचाचणी तंत्रज्ञ संजय चव्हाण यांचे निधन

भाभा अणुसंशोधन केंद्रातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दै.‘वार्ताहर’चे संपादक राजेंद्र चव्हाण यांचे ते ज्येष्ठ बंधू होत.
पोखरण अणुचाचणी तंत्रज्ञ संजय चव्हाण यांचे निधन

अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळात झालेल्या ऐतिहासिक पोखरण अणुचाचणी प्रक्रियेतील एक महत्वपुर्ण तंत्रज्ञ, भाभा अणुसंशोधन केंद्रातील तांत्रिक पर्यवेक्षक संजय चव्हाण यांचे वाशीतील फोर्टीज रुग्णालयात निधन झाले.ते ५९ वर्षांचे होते. आध्यात्मिकदृष्टयाही बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या संजय चव्हाण  यांच्या पार्थिवावर  जुईनगर येथील सारसोळे मोक्षधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी विविध  क्षेत्रातील अनेक मान्यवरांसह भाभा अणुसंशोधन केंद्रातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दै.‘वार्ताहर’चे संपादक राजेंद्र चव्हाण यांचे ते ज्येष्ठ बंधू होत.

संजय  चव्हाण यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे वाशीतील फोर्टीज रुग्णालयात गेल्या महिन्याच्या प्रारंभी दाखल करण्यात आले होते. त्यांच्या मेंदूत संसर्ग झाल्याने त्यांच्यावर अतिदक्षता  विभागात उपचार केले जात होते. त्यांच्या रक्तदाब घटत जाऊन ८ सप्टेंबर रोजी सकाळी ८.५५ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

भाभा अणूसंशोधन केंद्रातील पीआयईडी विभागाचे प्रमुख, अणुशास्त्रज्ञ डॉ.परितोष पी.नाणेकर, सेक्शन हेड अणुशास्त्रज्ञ बी.एन. रथ, अणूशास्त्रज्ञ सर्वश्री अश्विनीकुमार, तपनकुमार असेच अन्य वैज्ञानिक अधिकारी, अणूतंत्रज्ञ  सर्वश्री अतुल लिखिते, पूरुषोत्तम कोंडेस्कर,संजय धर्माधिकारी, शैलेश मातवणकर, सुरजकुमार, त्रिपाठी, साहू, राजेश जाधव,आर.सी. विश्वकर्मा, नरेश व अन्य मान्यवर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. चोगले, कृष्णकांत कोळी, भट अन्य निवृत्त कर्मचारी व अधिकारीही  यावेळी उपस्थित होते.

या प्रसंगी दैनिक पुण्यनगरी,मुंबई चौफेर, यशोभूमी वृत्तपत्र समूहाचे  मालक,संपादक प्रवीण शिंगोटे, महाव्यवस्थापक व्ही.आर तळेकर,  दैनिक नवशक्तिचे संपादक संजय मलमे, ठाणे वार्ताचे संपादक संजय पितळे ज्येष्ठ पत्रकार अंकुश वैती तसेच अन्य मान्यवर पत्रकार व वृत्तपत्र क्षेत्रातील अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते .

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in